अरे हे काय बोलून गेला अभिजित दिपके


नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी
NEET पेपर फुटी प्रकरणात जंतर मंतर वर आंदोलन करून आणि तत्कालीन शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन काही GEN Z च्या गळ्यातील तावीज बनलेल्या अभिजित दिपके याने पंतप्रधान मोदी बद्दल असे वक्तव्य केले आहे की तुम्हाला ते कळल्यावर खरंच हा मुलगा उच्चशिक्षित आहे का ? किंवा मुलांच्या नावाने उभा केलेल्या या लढ्याला तो वेगळे रूप देऊ पाहत आहे असा प्रश्न तुमच्या मनात देखील निर्माण होईल.चला तर पाहूया काय आहे प्रकरण ……
लोकसभेनंतर राज्यसभेतही पेपर लीक विरोधातील विधेयक मंजूर करण्यात आले. आता हे विधयेक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले. हे विधेयक मंजूर करून घेणे म्हणजे सरकारचा मोठा विजय मानला जात आहे.
नीट पेपरफुटीनंतर कायद्यात काही मोठे बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर नियमात बदल करून हे विधेयक संसदेत सादर करण्यात आले. विधेयकाच्या मंजुरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर निशाणा साधताना कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके दिसले. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. नरेंद्र मोदी यांच्या चमकणाऱ्या त्वचेवरून निशाणा साधला. गुरूवारी रात्री उशीरा पीएम मोदी यांनी सेल्फी व्हिडीओ शेअर करत परीक्षा प्रक्रियेसाठी हे विधेयक म्हणजे मोठे पाऊस असल्याचे म्हटले.
पेपरफुटी करणाऱ्यांना सोडणार नसल्याचेही यादरम्यान त्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याच व्हिडीओवर निशाणा साधत अभिजीत दिपके यांनी इंस्टाग्रामवरील व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा जास्त चमकदार आहे. अभिजीत दिपके याने व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी यांच्या चमकदार त्वचेवर टिप्पणी केली. आता अभिजीत दिपके याची ही कमेंट चर्चेचा विषय ठरली आहे.
नीट पेपरफुटीपासून पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर सेल्फी व्हिडीओ तयार करून व्हायरल करत आहेत. कॉकरोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांचा झाला. सुरूवातीला भाजपाने त्यांचा राजीनामा घेणे टाळले. मात्र, वाढलेल्या दबावानंतर हा राजीनामा घेण्यात आला. धर्मेंद्र प्रधान ओडिसाचे मोठे भाजपा नेते आहेत.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. जंतर मंतरवरील आंदोलन चिघळत होते. देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. ज्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. मात्र, अजूनही कॉकरोच जनता पार्टी आणि सरकारमधील संघर्ष थांबला नाही. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या नाही तर अजून मोठे आंदोलन करू असा इशारा अभिजीत दिपके यांनी सरकारला दिला. यासोबतच भाजपावर काही गंभीर आरोप करताना अभिजीत दिपके दिसले आहेत.




