क्राइम

किळसवाणा प्रकार पत्नी वर मित्रांना करायला लावायचा लैंगिक अत्याचार स्वतः लाईव्ह पाहायचा 

Spread the love

बुलदंशहर / नवप्रहार ब्युरो

                    उत्तरप्रदेश च्या बुलदंशहर येथून एक लाजिरवाना आणि किळसवाणा प्रकार उघड झाला आहे. येथे एक पती आपल्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करायला लावायचा. त्या बदल्यात तो त्यांच्या कडून पैशे घ्यायचा. आणि पत्नीवर लैंगिक अत्याचार होत असताना तो हे सगळे लाईव्ह पाहायचा. त्रास असह्य झाल्यावर महिलेने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

हा किळसवाणा प्रकाराला कंटाळून अखेर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच न्याय मिळावा अशी मागणी केली.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले, ‘२०१० साली बुलंदशहरच्या गुलावठी येथील एका पुरूषासोबत लग्न झाले. लग्नानंतर २ मुलगा आणि २ मुलगी असे ४ मुले आहेत. पती कामानिमित्त सौदी अरेबियात राहतो आणि तिथे मेकॅनिक आहे. तो वर्षातून २ वेळा घरी येतो. महिलेने आरोप केला की, ४ मुले असूनही एक महिन्यांची गर्भवती आहे. कारण पतीचे मित्र घरी येतात आणि लैंगिक अत्याचार करतात. गेल्या ३ वर्षांपासून हा किळसवाणा प्रकार सुरू आहे, आणि पती सौदी अरेबियातून हे सगळं लाईव्हद्वारे पाहतो. मुलांसाठी गप्प राहिली होती. पण आता हद्द झाली आहे.’

मिंत्राकडून लैंगिक अत्याचार आणि मोबदल्यात पैसे

पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले, ३ वर्षांपूर्वी तिचा पती दोन मित्रांसह घरी आला होता. नंतर पतीने पत्नीला दोन मित्रांच्या स्वाधीन केलं. पैसे घेऊन पती निघून गेला. मात्र त्यानंतर दोघांनी लैंगिक अत्याचार केला. दोघेही बुलंदशहरचे रहिवासी असून, पती सध्या परदेशात आहे. दोघे मित्र घरी कधीही येतात आणि अत्याचार करतात. अत्याचार करत असताना, मित्र पतीला लाईव्ह व्हिडिओ दाखवतात. जर विरोध केला, तर मित्र मारहाण करतात.

महिलेने पतीला जाब विचारले असता, पैसे देत असल्याचं सांगत तिला गप्प बसण्यास सांगितले. काही कारवाई केल्यास घटस्फोट देईन, अशी पतीने धमकी दिली. मात्र, याच जाचाला कंटाळून तिने तिच्या पालकांसह बुलंदशहरचे एसपी यांची भेट घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवला असून, या प्रकरणाबाबत पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close