स्त्री-शिक्षणाचा दीपस्तंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आ. -सौ.सुलभाताई खोडकेंनी केले विनम्र अभिवादन
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे द्वार खुले केले -आमदार सौ.सुलभाताई खोडके
समाजसुधारक,शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री-सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आमदार-सौ.सुलभाताई खोडके जनसंपर्क कार्यालयात विनम्र आदरांजली
अमरावती(प्रतिनिधी)भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ज्यांना ओळखले जाते.आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावली.सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.सावित्रीबाई जोतीराव फुले या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा जोतीराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावली.सावित्रीबाईंना स्त्रीवादाची जननी मानले जाते. असे प्रतिपादन आमदार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले.शुक्रवार दिनांक ३ जानेवारी-२०२५ रोजी अमरावती रेल्वे स्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक मार्ग परिसर स्थित जनसंपर्क कार्यालयात स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सर्वप्रथम स्त्रीवर्गास ज्ञानाची कवाडे खुली करणाऱ्या,यासोबतच तत्कालीन काळात विषमतेचे परिस्थितीवर मात करून जिद्दीने व ध्येयवादाने ज्ञानदानाचे पवित्र कार्य अखंडितपणे सुरू ठेवणाऱ्या क्रांतीज्योती-सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी पूजन-वंदन-माल्यार्पण करीत विनम्र अभिवादन करीत आदरांजली वाहिली. तदनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष-संजय खोडके, यश खोडके यांच्या समवेत अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस नमन करून पुष्प अर्पण केले.आपल्या संबोधनात पुढे बोलताना आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. या दोघांनी १ जानेवारी १९४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ती शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात.३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो.१० मार्च १९९८ रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिध्द केले.२०१५ मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. आज महिला पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत. मात्र एक काळ असा होता, जेव्हा स्त्रीला साधे शिक्षण घेण्याचे अधिकारही नव्हते.तेव्हा स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली ती समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांनी.पतीच्या सोबतीने तेव्हा त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनीही या कार्यात स्वतःला झोकून दिले. मुलींना शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक झाल्या.त्यासाठी त्यांनी जोतिबा फुले यांच्या कडून स्वतः ज्ञानाचे धडे घेतले. सावित्रीबाई फुले यांचे या क्षेत्रातील योगदान एव्हढे मोठे आहे की आज प्रत्येक सुशिक्षित स्त्री आयुष्यभर त्यांची ऋणी राहील.महिलांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यार्धात ज्यावेळी भारतासारख्या रुढीवादी परंपरा असणाऱ्या देशात स्त्रीला समाजात ” चूल आणि मूल ” एव्हढेच स्थान होते.महिलांना समाजात कोणताही दर्जा दिला जात नव्हता, अशावेळी महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा,नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. अशा या महान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे द्वार खुले केले.महिलांचे प्रेरणा स्रोत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण विनम्रपणे अभिवादन करीत शब्दसुमनांनी आदरांजली अर्पण करतेय.या शब्दांत शब्दसुमनांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला.यावेळी सर्व उपस्थितांनी स्त्रीत्वाला सन्मान प्रदान करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा एकच जयघोष केला.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.