सामाजिक

संत तुकाराम महाराज चौक सौंदरीकरण देहू नंतर  तेल्हाऱ्यात -पालकमंत्री आकाश फुंडकर

Spread the love
तेल्हारा / प्रतिनिधी
–  या काही वर्षांमध्ये तेल्हारा  शहराचे रूप पालटत असून आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या नेतृत्वात शहराचा झपाट्याने विकास होत अशे  यामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज चौक सौंदरीकरण देहू नंतर  तेल्हाऱ्यात साकारल्या जात असल्याचे  प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड. आकाश दादा फुंडकर  यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज जयंती महोत्सवानिमित्त तेल्हारा  येथे संत तुकाराम महाराज चौक लोकार्पण सोहळा निमित्त कुणबी युवक संघटना  तालुका व शहराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उद्घाटन पर भाषणात केले केले.
कुणबी युवक संघटनेच्या वतीने तेल्हारा  शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा जगद्गुरु संत तुकाराम महाराज जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये संत तुकाराम महाराज चौक लोकार्पण सोहळा सुद्धा घेण्यात आला असून त्यामध्ये आकाश दादा फुंडकर  आपल्या उद्घाटन पर भाषणात  पुढे म्हणाले की या  शहरावर भाऊसाहेब फुंडकर यांचे नितांत प्रेम होते आणि मी सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करीत असताना अनेकांशी माझे स्नेहाचे संबंध आहेत असे ते म्हणाले. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. प्रकाश भारसाकळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री आ. संजय कुटे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अनिल गावंडे तेल्हारा पालिकेचे मुख्याधिकारी सतीश गावंडे शुकदास गाडेकर महाराज  माजी जि. प.सदस्य  संध्याताई वाघोडे शोभाताई शेळके सुनील फाटकर गोपाल दातकर प्रदीप वानखडे अनंत अवचार माजी न.प.अध्यक्ष  सुमित्राबाई ठाकरे कान्होपात्रा फाटकर जयश्री पुंडकर मा.न.प.सदस्य  भागीरथीबाई मामनकार वंदना लासुरकर सुचिताताई तायडे  सुनिता ठोकणे श्रीराम टोहरे  कैलास ठोकणे रामभाऊ फाटकर अरुणाताई ठाकरे आरतीताई गायकवाड ,गजाननराव नळकांडे आदी मान्यवर उपस्थित होते. 2 फेब्रुवारीला सकाळी महाआरती ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व 21 रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वल दबडघाव सर व बंटी राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे भव्य दिव्य स्वरूप पाहता संपूर्ण सोहळा यशस्वी करण्याकरिता  कुणबी युवक  संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बाहकर शहर अध्यक्ष विठ्ठलराव मामनकार   महिला संघटना तालुका अध्यक्ष प्रतिभाताई वाकोडे शहराध्यक्ष साधनाताई  माहोकार तसेच कुणबी युवक  संघटनेच्या  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close