सामाजिक
संशयित म्हणून ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर झाले व्हायरल तो स्वतः झाला पोलिसांसमोर हजर


हडपसर च्या कामधेनू इस्टेट मधील हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब आढळून आल्याने खळबळ माजली होती. दरम्यान सोशल मीडियावर एका तरुणाचा संशयित म्हणून व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही बाब तरुणाचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्या लक्षात आल्यावर तरुण स्वतः पोलिसांसमोर हजर झाला. तर पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
मांजरी येथील घावटे वस्ती येथे असणाऱ्या मोबाईल शॉप वर पोलिसांनी गुरुवारी उशीरा छापा टाकला.मात्र पोलिस येथे जाण्याआधी संशयित फरार झाला.
मांजरीत पोलिसांनी छापे टाकले असून, दहशतवादी विरोध पथकासह अनेक यंत्रणा मांजरीत दाखल झाल्या आहेत. एका मोबाईल शॉप वर पोलिसांनी छापा टाकला असता संशयित फरार झाला आहे. काही आक्षेपार्ह वस्तू तेथे सापडल्याचे सूत्राकडून माहिती मिळत आहे. हा परिसर सील केला असून पोलीस तपास करीत आहेत.
स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेत आहेत
हडपसर येथील कामधेनु इस्टेट मधील उषाकिरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉस्पिटलमध्ये बॉम्ब मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. अद्याप हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणारा व्यक्ती पोलिसांना मिळून आलेला नाही. हॉस्पिटल आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेच पोलिसांनी ताब्यात घेतले असून, स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेत आहेत.
दरम्यान, पोलिसांचा तपास विविध अँगलने सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेला दुचाकीस्वार स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. सोशल मीडियावर संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला व त्याच्या नातेवाईकांना ही बाब समजली. त्यानंतर त्याने पोलिसांसमोर हजर होत आपली बाजू मांडली. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
| Cookie | Duration | Description |
|---|---|---|
| cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
| cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
| cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
| cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
| cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
| viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!



