सामाजिक

अधिकाऱ्याच्या ढिसाळ कारभाराणे हिवरा बू रहिवासी घरकुलापासून वंचित

Spread the love

अधिकाऱ्याच्या ढिसाळ कारभाराणे हिवरा बू रहिवासी घरकुलापासून वंचित

७ दिवसात न्याय न मिळाल्यास जनता दलाचे ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी अमरावती – सतीश वानखडे

अमरावती –
नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती मधील सहाय्यक घरकुल बांधकाम निरीक्षक रत्नापारखे यांच्या कामचुकारपणाच्या कारणाने पिढीत, शोषित घटकांना घरकुल लाभापासून वंचित रहावे लागले आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्क्यातील हिवरा बु. गावात जिल्हा परिषद अमरावती मागणीप्रमाणे ग्रामपंचायतीने घरकुलासाठी पात्र असणाऱ्या ०७ लाभार्थ्यांची यादी व त्यांच्या फाईल्स पंचायत समिती कडे पाठविण्यात आलेल्या होत्या. त्या मध्ये जयश्री नन्नवरे , वासुदेव इंगोले , अरुण वाघमारे या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून पंचायत समिती कडे पाठविणे अपेक्षित होते. परंतु नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती येथील अधिकाऱ्या कडून लाभार्थ्याच्या कागदपत्रे दिलेल्या कालावधीत ऑनलाईन करण्यात न आल्याने लाभार्थ्याना घरकुल लाभापासून वंचित राहावे लागत आहे. आता काही कारणाने शासन निर्णयात बदल झाला असल्याने कारण बोलून घरकुल लिस्टप्रमाणे नावे घेण्यात येतील असे सांगण्यात आले. त्यामुळे सदर लाभार्थ्यांच्या फाईल ऑनलाईन झाल्या नसल्याचे कारण सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्याच्या अश्या कामचुकार पणाने व वेळकाढूपणामुळे गरीब , गरजू कुटुंबांना घरकुला करिता पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. यामुळे आपल्याला उघडयावर राहण्याची वेळ येत असल्याने लाभार्थी हवालदिल होत असून संबंधित अधिकाऱ्याना पाठीशी घालण्याचे काम वरीष्ठाकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. घरकुल बांधकाम निरीक्षक अधिकारी रत्नपारखे यांचेशी घरकुला बाबत चर्चा केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याच्या तक्रारी आहे . अशा अधिकाऱ्यावर जिल्हा परिषद कडून कठोर कार्यवाही करण्यात यावी. व पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा या बाबत अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिलाध्यक्ष मयूर मेश्राम यांच्या कडून निवेदन देण्यात आले आहे. सदर अधिकाऱ्यावर ०७ दिवसाच्या आत कार्यवाही न झाल्यास अपंग जनता दल सामाजिक संघटना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आलेला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close