मातोश्री कृष्णाबाई देशमुख शाळेत क्षय रोग मार्गदर्शन शिबिर चे आयोजन
अमरावती – महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभाग च्या वतीने शंभर दिवस कार्यक्रम राबविण्याचे धोरण अवलंबिले असून ह्या मध्ये कुष्ट रोग , क्षय रोग , एच एम पी वि सारखे आजार बाबत जनजागृती करून नागरिकांना मध्ये आजाराची माहिती पोहचली पाहिजे प्रतिबंधात्मक उपाय करून आजारावर मात करावी ह्या उद्देशाने प्रभू कॉलनी येथील कमलाबाई देशमुख शाळा येथे अमरावती महानगर पालिकेच्या क्षय रोग विभागातर्फे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले संपूर्ण शहरात मनपा व खाजगी शाळेत राबवण्याचे आदेश मनपा आयुक्त सचिन कलंत्रे,आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे यांनी दिल्या मुळे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ फिरोज खान शहर क्षय रोग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला तसेच डॉ रुपेश खडसे शहर साथ रोग अधिकारी यांनी मार्गर्दशन केले की टीबी मुक्त भारत करायचे आहे त्या साठी सर्व जनतेनी एकजूट होऊन प्रतिबंधात्मक उपाय जसे मास्क लावणे ,हात स्वच्छ धुणे ,सोशल डीस्टनिंग ठेवणे योग्य वेळी आपल्या डॉक्टरांना दाखवने व निदान करणे असे सांगितले डॉ फिरोज खान यांनी सुद्धा सांगितले की खोकल्या तून रक्त पडत असेल तर मोफत तपासणी आपल्या नजीकच्या शहरी आरोग्य केंद्र येथे करावी विविध प्रश्नाची उत्तरे दिल्या मुळे ह्या कार्यक्रमात चार मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले मुख्याध्यापक तेलमोरे तसेच टीबी पर्यवेक्षक कांबळे ,आरोग्य सेवक बबन खंडारे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले व आशा वर्कर , परिचारिका कर्मचारी यांनी कार्यक्रम घेण्यास मेहनत करूंन यशस्वी केला