क्राइम

लाचखोर पोलिस अधिकारी आणि हवालदार एसीबी च्या जाळ्यात

Spread the love
विशेष प्रतिनिधी / छत्रपती संभाजीनगर
            तरुणाच्या विरोधात आलेल्या तक्रार अर्जावर कुठलीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लाचखोर पोलिसांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.
 सहायक पोलिस निरीक्षकाला आणि पोलिस अंमलदाराचा आरोपीत सहभाग आहे.
विशेष म्हणजे, ही धडक कारवाई शुक्रवारी (दि. ५) मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या आवारातच करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे शहर पोलिस दलात कमालीची खळबळ उडाली आहे. संजय नागुसिंग बहुरे (वय ४८, सहायक पोलिस निरीक्षक, रा. मयूरपार्क) आणि गोकुळ अनिलराव खटावकर (वय ४३, पोलिस अंमलदार, रा. पिसादेवी) अशी लाचखोरी करणाऱ्यांची नावे आहेत.
या प्रकरणातील २२ वर्षीय तक्रारदार तरुणाच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आणि गुन्हा दाखल न करण्यासाठी अंमलदार गोकुळ खटावकर याने ५ जून रोजी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) कार्यालय गाठून याविषयी तक्रार नोंदवली.
पोलिस ठाण्यातच रचला सापळा; दोघे रंगेहाथ ताब्यात
तक्रारदाराने दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ५) पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यावेळी अंमलदार खटावकर याने ५० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच सहायक पोलिस निरीक्षक संजय बहुरे याने या भ्रष्टाचारास प्रोत्साहन दिल्याचेही पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या इमारतीतच एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खटावकर आणि बहुरे या दोघां एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी मुकुं पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close