क्राइम
मित्राच्या मदतीने केली कुटुंबाची हत्या पण या कारणाने स्वतः ही जीव गमावला


लखनऊ / विशेष प्रतिनिधी
उच्चभ्रू कुटुंबातील तरुणाने डोक्यावर झालेल्या कर्जा पायी स्वतःच्या आई वडील आणि बहिणीला संपवले. आणि घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. मित्राच्या साह्याने केलेल्या या गुन्ह्यात दागिने आणि रोकड वाटपावरून दोघात भांडण झाले. भांडणात मित्राने या कुटुंबातील तरुणाला देखील संपवले आणि त्याच्यावर ऍसिड टाकून तेथून पळ काढला. पोलिसांनी अवघ्या १२ तासात खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार प्रयागराज येथील वैश्य कुटुंबातील चार लोकांची हत्या करण्यात आली होती. विरेंद्र वैश्य, अनीता, मिनाक्षी आणि अभिषेक अशी मृतांची नावं आहेत. या कुटुंबाची बाजारात अनेक दुकानं होती. त्यांच्या घरात भाडेकरूही राहायचे बऱ्याच मालमत्ता असूनही अभिषेक कर्जात बुडाला. त्यानं त्याचा मित्र अभिषेकला हाताशी धरून हत्याकांड रचलं.
पोसिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत प्रकरणाचा गुंता सोडवला. सनी गुप्ता असं प्रमुख आरोपीचं नाव आहे. तो प्रयागराजच्या मुठ्ठीगंजचा रहिवासी आहे.
विरेंद्र यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांनी मोठा मुलगा अभिषेक आणि मुलगी मिनाक्षी यांना एक-एक दुकान दिलं. अभिषेक साफसफाईशी संबंधित वस्तूंचा व्यापारी होता. त्याच्यावर बरंच कर्ज होतं. त्यामुळे वडील रविंद्र यांच्याशी त्याचे सतत खटके उडायचे. वडिलांनी त्याला त्यांच्या मालमत्तेतील वाटा देण्यास स्पष्ट नकार दिला होता.
अभिषेक वडिलांवर संतापला होता. रागाच्या भरात त्यानं वडिलांसह आई आणि बहिणीला संपवलं. अभिषेक आणि सनी यांनी मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास मिनाक्षीला संपवलं. त्यावेळी ती गिफ्टचं दुकान उघडायला जात होती. यानंतर अभिषेक आणि सनीनं आई, वडिलांना संपवलं.
यानंतर दोघांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लुटली. लुटलेला माल वाटून घेण्यासाठी ते अभिषेकच्या दुकानात आले.वाटाघाटी करताना त्यांच्यात वाद झाला. भांडण टोकाला गेल्यावर सनीनं अभिषेकलाही संपवलं. त्यानंतर त्याच्यावर प्रसाधनगृह
स्वच्छ करण्यासाठी वापरलं जाणारं ऍसिड टाकलं. मग त्यानं अचानक दुकान बंद केलं. याबद्दल लोकांनी विचारणा केली असता त्यानं वेगवेगळी उत्तरं दिली.
विरेंद्र यांचे भाचे मनजीत केसरवानी यांनी तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. घर आणि दुकानाचं कुलूप फोडून चारही शव ताब्यात घेण्यात आले. आरोपी सनीला अटक करण्यात आली. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. पोलिसांनी आरोपीकडून एक लोखंडी पाईप आणि लुटलेले दागिने जप्त केले आहेत. त्यांची बाजारातील किंमत दीड कोटीच्या आसपास आहे.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीनं शवांपासून १ मीटर दूरवर एक मेसेज लिहिला. ‘बंटी, बबली आणि सुनेनं मारलं’ असा मेसेज लिहिण्यात आला होता. विरेंद्र यांच्या धाकट्या लेकानं बऱ्याच वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. या लग्नामुळे कुटुंबात नाराजी होती. त्यांना घरातून हाकलण्यात आलं होतं. परिसरातील काही जण विरेंद्र यांच्या धाकट्या लेकाला आणि सुनेला बंटी आणि बबली नावानं हाक मारायचे. हत्येचा आरोप त्यांच्यावर व्हावा या उद्देशानं आरोपीनं मेसेज लिहून पोलिसांची दिशाभूल




