क्राइम

महिला स्वच्छतागृहामध्ये लपून महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्या भामट्या शिक्षकाला अटक 

Spread the love

नागपूर  / नवप्रहार डेस्क

                    ज्याच्या कडे देशाचे भविष्य घडविण्याची जबाबदारी आहे. त्याच शिक्षकी पेशातील व्यक्ती कडून महिला स्वच्छता गृहात लपून महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्या भामट्या शिक्षकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. हा शिक्षक यापूर्वी देखील अश्याच कृत्यात पकडला गेला होता. त्यांनतर त्याला शाळा प्रबंधनाने काढून टाकले होते हे विशेष.

मंगेश खापरे (३८, इतवारी) असे आरोपीचे नाव आहे. तो दिघोरी येथील एका शाळेत कलाशिक्षक आहे. शुक्रवारी विदर्भ साहित्य संघ संकुलात एक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेथे एक महिला स्वच्छतागृहात गेली असता मंगेशने खिडकीतून तिचा व्हिडीओ बनविला. महिलेला हालचाल जाणविल्यामुळे तिला हा प्रकार लक्षात आला. तिने आरडाओरड केल्याने नागरिकांनी मंगेशला रंगेहाथ पकडले. त्याचा मोबाईल तपासला असता त्यात अशा प्रकारचे महिलांचे स्वच्छतागृहातील ८ ते १० व्हिडीओ होते. सजग नागरिकांनी लगेच सिताबर्डी पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यांनादेखील धक्काच बसला. तो दिघोरीतील वैभवनगर येथील एका शाळेत शिक्षक आहे. त्याच्याविरोधात महिलेने तक्रार केली असून मध्यरात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आरोपीला अगोदरदेखील झाली होती अटक
आरोपी मंगेश खापरे याला २०२४ मध्येदेखील अटक झाली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवादरम्यान स्वच्छतागृहात त्याने महिलांचे व्हिडीओ बनविले होते. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणी असा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली होती. त्याला प्रवेशद्वार सजविण्यासाठी बोलविण्यात आले होते व त्याने किळसवाणा प्रकार केला होता. त्याला त्यानंतर संबंधित शाळेतून काढण्यात आले होते. त्यानंतर तो दिघोरीतील शाळेत लागला होता.

२०२२ पासुन सुरू आहे हा प्रकार- मंगेशने पहिल्यांदाच असा प्रकार केलेला नाही. त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना अगोदरदेखील १८ ते २० मोबाईल क्लिपिंग्ज सापडल्या होत्या. त्यात २०२२ मधील मोबाईल क्लिपिंग्जचादेखील समावेश आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close