राजस्थानी ब्राम्हण महिला मंडळा तर्फे विवाह प्रमाणपत्र करीता मोहीम
अकोला / प्रतिनिधी
राजस्थानी ब्राम्हण महिला मंडळाने वेळोवेळी नवीन विचार करून समाजाच्या उन्नतीसाठी उत्तम कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षण व मुख्यमंत्री निधी योजना व कैंसरग्रस्त व्हॅक्सीन कार्यक्रमानंतर आता सरकारी आवश्यक पेपर्सवर कार्यक्रम आयोजित केला आहे. आज कोणत्याही कामासाठी जसे की व्हिसा, एडमिशन आदी घेण्यासाठी काही आवश्यक दस्तावेजां ची आवश्यकता असते, त्यापैकी एक महत्वाचा दस्तावेज म्हणजे “विवाह प्रमाणपत्र”. राजस्थानी ब्राम्हण महिला मंडळाने या दस्तावेजाची निर्मिती करण्यासाठी महानगर पालिकेच्या सहकार्याने कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्या सर्वांनी या कार्यक्रमाचा पूर्ण फायदा घ्यावा व दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आपले विवाह प्रमाणपत्र बनवावे. समाजातील गरजू लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राजस्थान ब्राम्हण महिला मंडळ अध्यक्षा किर्ती आनंद शर्मा एवं समस्त राजस्थानी ब्राह्मण महिला मंडल अध्यक्षा किर्ति शास्त्री, विद्याजी शर्मा,लताजी शर्मा,मनीषाजी तिवारी, शशीजी तिवारी,गीताजी शर्मा,कल्याणीजी शर्मा, दुर्गाजी शर्मा,उमाजी तिवारी
यांनी केले आहे.