ग्रामीण रुग्णालय घाटंजी येथे आरोग्य शिबिर संपन्न
घाटंजी तालुका प्रतिनिधी – सचिन कर्णेवार.
माननीय लोकनेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या वाढदिवसा निमित्त रोग निदान शिबिर व हायड्रोसिल रुग्ण तज्ञ तपासणी शिबिर ग्रामीण रुग्णालय घाटंजी येथे दिनांक 30/06/2023 रोजी आयोजित करण्यात आले होते. शिबिरात उद्घाटक म्हणून माननीय आमदार डॉ. संदीप धुर्वे होते. शिबिरास उपस्थिती दर्शवून डॉ धूर्वेनी सदर शिबिरात होणाऱ्या आरोग्य तपासणी व हायड्रोसिल तपासणी बाबत रुग्णांना मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक रोगाचे उपचार व निदान मोफत मध्ये व्हावे या करिता असेच प्रयत्नशील राहू असे मत व्यक्त केले. सदर आरोग्य तपासणी करिता मा. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील डॉक्टर निखिल गडदे जनरल फिजिशियन ,डॉक्टर साकेत मुंदडा व टीम, ग्रामीण रुग्णालय घाटंजी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नीरज कुंभारे, डॉक्टर पुंडे ,डॉक्टर ठमके, डॉक्टर उमरेडकर ,डॉक्टर शिंदे ,डॉक्टर पवार ,डॉक्टर मुन व आरोग्य कर्मचारी तसेच शिबिराचे आयोजक भारतीय जनता पार्टी घाटंजी तालुका व शहर अण्णासाहेब पारवेकर चाहते, डहाके सर भाजपा तालुका अध्यक्ष, प्रशांत उगले,राम खांडरे शहर अध्यक्ष,अंकुश ठाकरे,प्रकाश खरतडे,बंडू डंभारे,चेतन जाधव पुंडलिक वाढई,विशाल कदम,प्रमोद कदम ,होनबा डंभारे,पंकज ठाकरे,अमित महल्ले,लक्ष्मण कोवे,गजानन महल्ले,रीना धनरे,राधिका गुंडावार व इतर कार्यकत्यांनी सहभागी होऊन शिबिर यशस्वी करण्यासाठी बहुमूल्य सहकार्य देऊन शिबीर यशस्वीपणे पूर्ण केले.शिबिरात एकूण 260 रुग्णांनी लाभ घेतला. त्यापैकी 10 हायड्रोसिल व 6 रुग्ण हर्निया व गाठीचे 10 रुग्ण निदान करून यवतमाळ येथे मेडिकल कॉलेजला वर्ग करण्यात आले.