आध्यात्मिक
ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन
भगवान श्री ज्ञानोबारायांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून दि. २४ ते २८ l ११ l २०२४ पर्यंत स्वानंद सुख निवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या मागे श्री संत सेवा आश्रम घुंडरे गल्ली श्रीक्षेत्र आळंदी येथे भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या अमृततुल्यवाणीतून श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा ज्ञानयज्ञाचे ( लागली समाधी ज्ञानेशांची ) दररोज दुपारी २ ते ४ यावेळेत भव्य आयोजन श्रीयुत रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या कुशल नेतृत्वामध्ये करण्यात आलेले आहे. तरी क्षेत्रातील आयोजित सदर्हू कार्यक्रमाकरिता बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवतात .
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1