कंपनीमधील कोंड्यात पडून एका मजुराचा गुदमरुन मृत्यू..
महादुला (बोरगांव) येथील रामदेव बाबा साळवंट कंपनीमधील घटना,
कंपनीमधील मजुराची सुरक्षा वाऱ्यावर,
मौदा प्रतिनिधी.
तालुक्यातील महादुला (बोरगांव) येथे रामदेव बाबा साळवंट कंपनी कार्यरत आहे. या कंपनीमधे बाहेर राज्यातील मजूर तसेच बालकामगार मजूर म्हणून कामावर आहेत. तर जवळ पासच्या परिसरातील मजूर सुद्धा मोठ्या प्रमाणात या कंपनीत कामावर आहेत. या कंपनीचा कारभार नुसता कागदी घोड्यावर नाचत असून संबंधित प्रदूषण मंडळ. सबंधित प्रशासन. व् स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही दिसून येते. या कंपनीत काल दिनांक २ जून 2023 ला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान महादुला येथील नरेश पतीराम बागडे 45 वर्षे याचा कंपनीमधील कोंड्यांवरुण घसरुण तो पडल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
कंपनी जवळील हाकेच्या अंतरावर असलेल्या महादूला येथील रहिवासी नरेश पतिराम बागडे 45 वर्षे हा मागील दोन वर्षापासून येथील असलेल्या रामदेव बाबा सालवंट कंपनीमध्ये मजूर म्हणून कामावर होता. नेहमी प्रमाणे तो काल 2 जूनला सकाळी 6 वाजता आपल्या घरुण आपल्या 4 वर्षाच्या चिमुकलीला बाय बाय करत कंपनीमध्ये कामावर गेला. तो कंपनीमध्ये बॉयलर मधून निघणाऱ्या कोंड्यावर तो काम करायचा. काम करत असताना त्याचा कोंड्यावरून तोल गेल्याने तो कोंड्यातील एका खड्ड्यात जाऊन पडला. वरील असलेला कोंडयाचा ढिग त्याच्या अंगावर पडल्याने त्याच्या गुदमरून मृत्यू झाला.
लगेच आजूबाजूच्या मजुराने नरेश कुठे गेला म्हणून पाहणी केली असता तो कोंडयाच्या ढिगाळात गेल्याचे पाहिले असता येथील लगेच आठ ते दहा मजुरांनी त्या कोंड्यातून नरेश ला बाहेर काढून त्याला भंडारा येथील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरने त्याला मृत्यू म्हणून घोषित केले. हा प्रकार भयावत घडला असताना कंपनी मालकांनी त्याच्या घरी माहिती सुद्धा दिली नाही. गावातील असलेल्या काही मजुरांनी त्याच्या पत्नीला व आई-वडिलांना माहिती दिली. नरेशच्या मृत्यू झाल्याची बातमी एकताच चार वर्षाच्या चिमुकलीसह पत्नी आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. घरचा कर्ता पुरुष गेल्याने आपल्या संसाराची आता राखरांगोळीच झाल्याने त्यांच्या पायाखालील जमीन सरकल्यागत झाले. हा कंपनीचा लापरवाहीपणा असाच सुरू राहिल्यास येतील काम करणाऱ्या मजुराची सुरक्षा धोक्यात असल्याचेही बोलले जात आहे.
घटनेची माहिती मौदा पोलिसांना देण्यात आली. लगेच पोलिसांनी घटनास्थळ गाटले कार्यवाही ला सुरुवात केली. यात नरेशचा मृत्यू झाल्याने कंपनी प्रशासनाने तात्काळ नरेशच्या कुटुंबीयांना 10 लाखाची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सुद्धा कुटुबियांनी केली.
……………………………………………………
कंपनीमधील बालकामगारांची सुरक्षा वाऱ्यावर…!!!!
रामदेव बाबा सालवंट कंपनीमध्ये बाहेर राज्यातील बालकामगार व मजूर मोठ्या प्रमाणात कामावर असल्याचेही बोलल्याची चर्चा रंगत आहे. नियमानुसार या कंपनीमध्ये बाल कामगारांना घेता येत नाही. मजूर कामावर असतांना त्यांच्या अंगात सुरक्षा कीट असणे गरजेचे आहे. परंतु कंपनी संचालक मंडळा सोबत असलेल्या हवसे गवसे नेते मंडळी व वरिष्ठ प्रदूषण मंडळ, तालुका प्रशासन. व स्थानिक ग्रामप्रशासन यांचे जवळीक संबंध असल्याने कंपनी संचालक मंडळांची हिंमत वाढली आहे. तर यात अनेक मजुरांची सुरक्षा वाऱ्यावर असून याला जबाबदार कोण? असाही प्रश्न पडला आहे. अजुन ही कंपनी कुणाचा तर बळी घेणार नाही ना? असही प्रश्न उपस्थित होत आहे. याच कंपनी चालकांचा मनमानी पणा शेतकरी सुद्धा सहन करित असून काही शेतकरी मदतिपासून आजही वंचित असल्याचे बोलल्या जात आहे.
4 वर्षाच्या चिमुकलीचे छत्र हरपले..!!.
नरेश हा घरचा मुख्य कर्ता पुरुष असल्याने त्याची आर्थिक परिस्थिती बेताची होती. कुटुंबात त्याला 4 वर्षाची चिमुकली मुलगी, पत्नी, वयोवृद्ध आई-वडील असा परिवार आहे. कंपनीमध्ये तो कधीकधी दोन पैसे जास्तचे मिळावे म्हणून तो डबल मजुरीवर काम करायचा. शेवटी नियतीला ते मान्य नसल्याने त्याला काल आपल्या परिवारापासून वेगळे व्हावे लागले. अखेर त्याच्या चार वर्षीय चिमुकलेचे वडीलाच्या मृतुने बाल वयातच छत्र हरपले.
बागडे कुटुंब कुडाच्या झोपडीत…..!!!
श्रीमंत कुटुंबापेक्षा आपणही कमी नाही म्हणून नरेश बागडे याचा कुटुंब मोलमजुरी करुण पोट भरायचे. नरेश याचे आई-वडील म्हातारे असून त्यांनाही नरेशचा आधार होता. संपूर्ण कुटुंबाचा भार नरेशवर असल्याने घरची परिस्थिती हाताबाहेरची असल्याने ते फाटक्या कवेलूच्या घरात राहायचे. त्यांचे नव्याने मागील महिन्यापूर्वी घरकुल सुद्धा मंजूर झाले. त्यांनी कवेलूचे घर पाडून ते कुटुंब घर बांधणीच्या तयारीला सुद्धा लागले होते. व ते महादुला येथील एका व्यक्तीच्या अंगणात कुडाची झोपडी टाकून राहायला सुद्धा गेले होते. परंतु नरेशच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाचे स्वप्नच अधुरे राहिले.
नरेशचा मृतु झाल्याची बातमी कंपनी प्रशासनाने नरेशच्या कुटुंबाला वेळीच का काळवले नाही?
जेव्हा घटना घडली तेव्हा नरेश हा कोंडयाच्या ढिगाऱ्यात दबल्या गेला होता. जेव्हा त्याला बाहेर काढले तेव्हाच त्याची माहिती नरेश याच्या कुटुंबाला देणे गरजेचे होते. परंतु कंपनी प्रशासनाला घटनेची देण्याचा इतका विचार का म्हणून आला असावा?. तर नरेश याचा मृतु कंपनी मधेच झाला असावा? असाही प्रश्न नरेशच्या कुटुंबाला पड़ला. म्हणून त्यांनी ही माहिती दडवुन ठेवली असावी? असाही प्रश्न त्याच्या कुटुंबाला पड़ला. कंपनी प्रशासनाने लगेच त्याला भंडारा येथे रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले. नंतर त्याच्या मृतूची बातमी नरेश यांच्या कुटुंबाला देण्यात आली. अगोदरच माहिती दिली असती तर चार वर्षीय चिमुकली व पत्नीने त्याच्या तोंडात दोन थेंब पाण्याचे पाजीले असते. असाही पत्नीने टाहो फोडला. सकाळी घरुन निघुन घेलेल्या नरेशचीच अंत्ययात्राच दुसऱ्या दिवशी झोपलेल्या अवस्थतेत पाहायला मिळाली, अखेर नरेशवर आज दुपारी 1 वाजता स्थानिक स्मशानभूमित पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंकार करण्यात