सामाजिक

पहिल्या मजल्यावरील खोलीचे दार उघडताच सगळे हादरले

Spread the love

तेलंगणा / विशेष प्रतिनिधी

                     ते सामायिक कुटुंब एकाच इमारतीत राहत होते. त्या दोघांचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. आज सकाळी भाऊ नवीन दाम्पत्याला नाश्त्याला बोलावण्यासाठी गेला असता, त्याने जे चित्र पाहिले ते पाहून तो गेल्या पाऊलीच परतला. कारण त्या दोघांनी आत्महत्या केली होती. त्याने हा प्रकार खाली येऊन सांगताच सगळ्यांनी नवदाम्पत्याच्या खोलीकडे धाव घेतली. घटना तेलंगणातील कुकटपल्ली येथे घडली आहे.

मृतांची ओळख 28 वर्षीय येमजला कार्तिक आणि 27 वर्षीय येरमल्ला मंजुला अशी पटली आहे. कार्तिक एका खाजगी कंपनीत मार्केटिंग विभागात कार्यरत होता, तर मंजुला गृहिणी होती. बालनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) पी. नरेश रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक आणि मंजुला यांचा विवाह याच वर्षी मार्च महिन्यात झाला होता.

सकाळी 11 च्या सुमारास कार्तिकचा भाऊ, जो त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहतो, तो दांपत्याला नाश्त्यासाठी बोलावण्यास गेला होता. मात्र, घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता कार्तिक मृतावस्थेत आढळून आला.

तपासात धक्कादायक माहिती समोर

भावाने शेजाऱ्यांच्या मदतीने मुख्य दरवाजा तोडला असता, मंजुला बेडवर मृतावस्थेत पडलेली दिसली. दोघांनाही तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुकटपल्लीचे उपनिरीक्षक के. नरसिंहा यांनी सांगितले की, “कार्तिकच्या शरीरावर काही जखमांच्या खुणा आहेत, मात्र मंजुलाच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमा नाहीत. मंजुलाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.”

कुटुंबीयांना मोठा धक्का

कार्तिकची आई इमारतीच्या तळमजल्यावर, तर मोठा भाऊ दुसऱ्या मजल्यावर राहतो. हे जोडपे पहिल्या मजल्यावर राहत होते. शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत कुटुंब एकत्र होते, तेव्हा सर्व काही सुरळीत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मंजुलाच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, सासरच्या मंडळींवर कोणताही संशय व्यक्त केलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ‘अरेंज मॅरेज’ होते. सध्या कुकटपल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close