क्राइम

मुश्फिक ने विवाहाचे आश्वासन देत बनवले शारीरिक संबंध 

Spread the love
मुलीचे लग्न झाल्यावर नवऱ्याला पाठवले संबंधाचे फोटो

                  प्रेमाचे नाटक करत त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढले. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे लावून दिल्यावर त्याने तिच्या नवऱ्याला तिचे आणि त्याचे शारीरिक संबंधाचे फोटो पाठवले. त्यामुळे तिचे लग्न मोडले. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष देऊन पुन्हा शारीरिक संबंध बनवले. मुलीने लग्नाची मागणी केल्या नंतर मात्र तो तिला टाळू लागला. त्यामुळे मुलीने पोलिसात तक्रार देत न्यायची मागणी केली आहे.

आरोपीचे तरुणीशी शरीरसंबंध

दरम्यान, 26 वर्षीय पीडित महिलेने महिला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तरुणीची मुश्फिक हुसैनशी 2025 मध्ये मैत्री झाली होती, मुश्फीकने तरुणीशी प्रेम व्यक्त केले, नंतर तिला अनैतिक शारीरिक संबंधांसाठी प्रलोभन दिले आणि तिचे शोषण केले. दरम्यान, तिच्या कुटुंबियांनी पीडितेचं दुसऱ्याच मुलाशी लग्न जुळवलं. विवाहानंतर आरोपी मुश्फिक तिला भेटायला बोलावू लागला होता.

पीडितेच्या नवऱ्याला पाठवले अश्लील व्हिडिओ

तो एवढ्यावरच न थांबता त्याने पीडितेच्या पतीला अश्लील व्हिडिओ-फोटो पाठवण्याची धमकी देऊ लागला, नंतर शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली आणि तिचे शोषण करून तिला ब्लॅकमेल केले. महिलेनं त्याच्या या कृत्याचा विरोध दर्शवला असता, आरोपीने तिच्या पतीला लग्नापूर्वी दोघांच्या नातेसंबंधाबाबत सांगितलं. तो एवढ्यावर न थांबता मोबाईलमधील अश्लील फोटो दाखवले होते.

लग्नाचे वचन आणि पुन्हा लैंगिक शोषण

पतीने तिला सोडून दिले आणि ती तिच्या माहेरी राहू लागली होती. पतीने तिला सोडल्यानंतर, आरोपी मुश्फिक पुन्हा त्या मुलीच्या जवळ येऊ लागला आणि तिला लग्नाचे वचन दिले. नंतर पीडितेनं त्याच्यावर लग्नासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने नकार दिला. नंतर त्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली.

हे प्रकरण जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 रोजी मुश्फिक हुसैनविरुद्ध लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग, धमकी आणि आयटी कायद्यांच्या कलमांखासी गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्यात.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close