अपघात

लँडिंग च्या वेळी विमान ट्रक ला धडकले 

Spread the love

सुदैवाने कुठलीही हानी नाही 

             धावपट्टीवर उतरत असताना  युनायटेड एयर लाईन्स च्या विमानाचा अपघात झाला आहे. विमान लँड होत असताना ते प्रथम खांबाला आणि त्यानंतर एका ट्रक का भिडले. सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही. विमान सुरक्षित पणे लँड झाले.

या घटनेत ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. फेडरल एव्हिएशन प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

फेडरल एव्हिएशन प्रशासनाने सांगितले की, यूनायटेड एअरलाइन्सचे १६९ (बोईंग ७६७) हे विमान नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत होते. रविवारी (३ मे) स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजता ही घटना घडली.

हे विमान व्हेनिसवरून येत होते. या विमानात २२१ प्रवासी आणि १० क्रू मेंबर्स होते. विमान नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना खांबाला धडकले आणि त्यानंतर ट्रकला धडकले. या घटनेत ट्रक चालक जखमी झाला असून, विमानाचेही नुकसान झाले आहे.

विमानाचे हे एक चाक ट्रकचालकाच्या खिडकीवरच आदळले. ट्रकचालकाला काही जखमा झाल्या असल्याचे चक पॅटराकीस यांनी सांगितले. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असून, या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close