क्राइम

तिचा आत्महत्येचा प्रयत्न , त्याने वारंवार तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप 

Spread the love
पंढरपूर / विशेष प्रतिनिधी

                   अभियांत्रिकी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनिशी गोड बोलून तिला आपल्या चारचाकी वाहनात टाकून महाबळेश्वर ला नेऊन  तेथील एका हॉटेल मध्ये तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तो तिच्यावर वारंवार शरीर सबंध बनवण्यासाठी दबाब टाकत होता.शेवटी त्याच्या या मागणीला वैतागलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला.

तीच्यावर येथील एका खासगी रुग्णालायात उपचार सुरु आहेत. सध्या पिडीत विद्यार्थींनी मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणी आरोपी आतिष पांडुरंग ताटे याच्या विरोधात पिडीतेच्या आईने करकंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटून गेला तरी आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

पिडीत विद्यार्थीनी ही इंदापूर येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रीकल इंजिनिअरच्या चौथ्या वर्षात शिकत असून ती त्याच महाविद्यालयात हॉस्टेलमध्ये राहण्यास होती. परीक्षा संपल्याने ती मागील महिन्याभरापासून ती गावी आली होती.

दरम्यान पिडीत विद्यार्थींनी ही 14 सप्टेंबर 2025 रोजी इंदापूरला जाण्यासाठी गावातील बसस्थानकावर सकाळी 10 वाजता उभी राहिली असताना आरोपी आतिश पांडुरंग तवटे तेथे आला. इंदापूर येथील काॅलेजमध्ये सोडतो असे सांगून तीला स्विप्ट कारमध्ये बसवून घेऊन गेला. गाडीत बसल्यावर आरोपीने पिडीतेला गोडबोलून फिरायला जाऊ असे सांगून त्याने महाबळेश्वर येथील एका हाॅटेलमध्ये नेले.

त्या ठिकाणी आरोपीने पिडीतेच्या इच्छे विरुध्द अत्याचार केला. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.दुसर्या दिवशी आरोपीने पिडीतेला इंदापूर येथील काॅलेजमध्ये सोडून तो निघून गेला. त्यानंतर आॅक्टोबर 2025 मध्ये आरोपीने पुन्हा पिडीतेला गाडीतील कॅमेर्यामध्ये व्हीडीओ आणि फोटो रेकाॅर्ड झाले आहेत अशी धमकी देऊन पुन्हा अत्याचार केला.

त्यानंतर आरोपीने पिडीतेला वारंवार भेटण्यासाठी बोलावून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने 8 एप्रिल रोजी सकाळी बाथरुमध्ये फरशी पुसण्यासाठी ठेवलेले एॅसीड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पिडीतेला तत्काळ उपाचारासाठी रुग्णालायत दाखल करण्यात आले. घटनेनंतर पुणे, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी तीच्यावर उपचार करण्यात आले. परंतु अद्याप पिडीत विद्यार्थीनी त्यातून बाहेर आली नाही.

फिर्यादीची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आतापर्यंत जवळपास तीन ते चार लाख रुपयांचा खर्च आला आहे. आता पैसे नसल्याने करकंब येथील एका खासगी रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, तीचा परिस्थिती नाजूक असल्याचे तीच्या नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी करकंब पोलिस तपास करत आहेत.

घटनेनंतर तीन दिवसांनी फिर्याद दाखल

8 मे रोजी घटना घडली. त्यानंतर तीन दिवसांनी करकंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिडीतेच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी करकंब पोलिस ठाण्यात गेले असता,त सुरवातीला पोलिसांनी दखल घेतली नाही. तीन दिवसानंतर रात्री 11 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी हा दुबई येथे सोन्याचा व्यापार करतो,त्याच्याकडे पासपोर्ट देखील आहे. गंभीर गुन्हा दाखल असतानाही तो अद्याप मोकटपणे फिरत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक करावी अशी मागणी पिडीतेच्या नातेवाईकांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close