क्राइम

ओळखीच्या व्यक्तीने घरात घुसून केला महिला डॉक्टर वर बलात्कार 

Spread the love
घटनेचे चित्रीकरण करून महिलेच्या मोबाईलवर पाठवले

कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी 

            घरात  महिला डॉक्टर एकटी असताना ओळखीच्या तरुणाने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. या घटनेचे मोबाईल मध्ये चित्रीकरण करून डॉक्टर महिले कडे १ लाख रुपयांची मागणी देखील करण्यात आलीं आहे.

या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन संशयित शक्ती विक्रम भोसले (वय २८, रा. शाहूपुरी, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली.

न्यायालयाने त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिला ३० एप्रिलला दुपारी तीन वाजता घरात एकटीच असताना शक्ती भोसले येथे आला. त्यानंतर घटनाक्रम घडला. या प्रकाराने धक्का बसलेल्या पीडिताने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांचे तोंड दाबून धरत त्याने वाच्यता केल्यास पतीसह पीडिताला ठार मारण्याची धमकी दिली.

मानसिक धक्का बसलेली महिला दोन दिवस घरातून बाहेरही पडली नाही. त्यानंतर शक्ती भोसलेने एक मे रोजी रात्री ११ वाजता पीडित महिलेच्या मोबाईलवर तो व्हिडिओ टाकला. शक्तीने फोन करून हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी एक लाखाची मागणी केली. त्यानंतर शनिवारी (ता. २) पीडिताने याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close