अपघात
धावत्या कार वर भलेमोठे झाड कोसळल्याने चार शिक्षिकांचा दुर्दैवी मृत्यू , ३ जखमी


हिमाचल प्रदेश / विशेष प्रतिनिधी
शाळा आटपून घरी परतत असताना चालत्या कार वर अचानक भलेमोठे झाड कोसळल्याने आणि त्यामुळे कार खोल दरीत पडल्याने कार मध्ये बसलेल्या शिक्षिकांपैकी चार शिक्षिकांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन गंभीर जखमी झाले आहेत. घटना हिमाचल प्रदेश च्या कुल्ली जिल्ह्यामध्ये घडली आहे.
शमशेर-गुगरा रस्त्यावर कारला अपघात झाला. झाड कोसळल्यामुळे कारचा चुराडा झाला. या कारमधून प्रवास करणाऱ्या ४ शिक्षिकांचा जागीच मृत्यू झाला. या चौघी शाळा सुटल्यानंतर घराच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतर शिक्षिका कारने घरी जात होत्या. वाटेत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. या वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले भलेमोठे झाड उन्मळून धावत्या कारवर कोसळले. चालकासह ७ जण या कारमधून प्रवास करत होते. या कारमध्ये बहुतांश शिक्षिका होत्या. झाडाच्या प्रचंड वजनामुळे आणि अति वेगामुळे कार रस्त्यावरून खाली दरीत कोसळली.
या अपघातामध्ये ४ शिक्षिकांचा मृत्यू झाला. तर ३ जण जखमी झाले. स्नेह लता, बंटी कौंडल, उषा कुमारी आणि सीमा आझाद या चौघींचा अपघातामध्ये मृत्यू झाला. त्या सर्वजणी नजीकच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या. त्यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. तर या अपघातामध्ये कार चालक सुरेश चंद, तारा देवी, रीना कुमारी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
| Cookie | Duration | Description |
|---|---|---|
| cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
| cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
| cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
| cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
| cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
| viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!



