सामाजिक

धामणगावला राजस्थान गाडीचा थांबा सुरू…

Spread the love

रेल्वे अंडर ब्रिज चे काम पूर्ण….
सल्लागार समितीच्या प्रयत्नांना यश ….
धामणगाव रेल्वे,
रेल्वे सल्लागार समितीच्या प्रत्येक बैठकीत सततपणे मागणी केल्याने धामणगाव रेल्वे स्टेशनवर राजस्थान जाण्याकरिता चेन्नई भगत की कोठी (जोधपुर) गाडी क्रमांक 12226 व गाडी क्रमांक 12225 या गाडीचा थांबा देण्यात आलेला आहे रेल्वे सल्लागार समितीने सल्लागार समितीच्या बैठकीत कोच इंडिकेटर लावण्यात यावे दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रवाश्यांकरिता मोठे शेड उभारण्यात यावे तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून प्लॅटफॉर्म २ वर जाण्याकरिता लोखंडी पूल (एफओबी) पुल करण्यात यावा त्याचप्रमाणे गौरक्षण जवळील दुसरे अंडर ब्रिज (भुयारी मार्ग) तयार करण्यात यावे अश्या मागण्या केलेल्या होत्या उपरोक्त मागण्यांपैकी केवळ राजस्थान जाण्याकरिता गाडीचा थांबा या मागणीला अतिविलंब होत होता परंतु रेल्वे प्रशासनाने सल्लागार समितीची सदर मागणी सुद्धा पूर्ण केलेली असून चेन्नई वरून भगत की कोठी (जोधपुर)जाणाऱ्या गाडीचा थांबा धामणगाव रेल्वे स्थानकावर आता देण्यात आलेला आहे
……………………………………
भाजपाचे तत्कालीन खासदार व रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष रामदास तडस तसेच आमदार प्रताप अडसड यांचा सुद्धा या कार्यात सिंहाचा वाटा असून आमच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याचे कार्य तडस आणि अडसड यांनी दिल्याचे सल्लागार समितीचे सदस्य कमल छांगाणी म्हणाले…
……………………………………….
भगत की कोठी(जोधपूर) ही गाडी हप्त्यातून पाच दिवस जाताना दुपारी १२.०२ वाजता तर चेन्नईकडे जाताना पहाटे ५.४२ ला धामणगाव रेल्वे स्थानकावर थांबणार आहे
रेल्वे सल्लागार समितीच्या या मागणीला सुद्धा रेल्वे प्रशासनाने मान्य करून राजस्थान गाडीचा थांबा धामणगाव रेल्वे स्टेशन येथे दिला त्यामुळे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य कमल छांगाणी,अर्चना राऊत, दिनेश बोबडे, सुनील साकुरे, दिनेश मुंदडा यांनी रेल्वे प्रशासनसह
स्टेशन प्रबंधक डी.आर. मुदलियार यांचे आभार व्यक्त केले आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close