क्राइम

घरासमोरी दुचाकी चोराणे पळविली

Spread the love

अज्ञात चोरा विरोधात वाडी पोलीस स्टेशनं ला गुन्हा दाखल.
वाडी ( प्रतिनिधी )
वाडी पोलीस स्टेशनं अंतर्गत आठवा मैल दवलामेटी येथील आठवडी बाजारात मोबाईल व दुचाकी चोरीच्या घटना नेहमी होत असतात . परंतु 29 नोव्हेंबर चा रात्री पालकर नगर येथील रुपेश कळमकर यांची पॅशन प्रो दुचाकी क्र. एम एच 40 ए एच 4292 त्यांचाच घरा समोरून चोरीला गेली ,दुसऱ्या दिवशी पहाटे झोपेतून जागे होताच सदर चोरीची घटना त्यांचा निदर्शनात आली परीवारातील ईतर सदस्य व रुपेश ने जवळ पास सर्व ठिकाणी दुचाकीचा शोध घेतला परंतु दुचाकी कुठेच आढळून आली नसल्याने वाडी पोलीस स्टेशनं गाठून रुपेश ने अज्ञात चोरा विरोधात तक्रार दाखल केली. सदर घटने मुळे परिसरातील नागरिकांत भीती चे वातावरण पसरले असून वाडी पोलीस स्टेशचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायंन्नवार यांनी कसून तपास करण्याची हमी देत चोरीला गेलेली दुचाकी शोधून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असे फिर्यादी ला सांगन्यात आले वाडी पोलीस दुचाकी चोरटयाच्या मुसक्या आवळण्यात कितीयशस्वी होतात या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close