हटके

वॉचमन च्या घरी सापडल्या अश्या वस्तू की सोशल मीडियावर होतेय चर्चा

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

                  सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या एका इमारतीच्या वॉचमनचा असाच एक अनोखा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. सर्वसाधारणपणे गार्डच्या खोलीत खुर्ची, टेबल आणि दैनंदिन वापरातील वस्तू दिसतात.

मात्र या खोलीतील एका छोट्याशा लाकडी शेल्फवर महागड्या लक्झरी ब्रँड्सच्या परफ्यूमच्या बाटल्या सजलेल्या पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

गार्डच्या शेल्फवर कोणते महागडे ब्रँड्स?

परफ्यूम इन्फ्लुएंसर चेतन आनंद यांनी आपल्या @the.dognosee या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. इमारतीतील गार्डला भेटायला गेल्यावर त्यांचं लक्ष छोट्या लाकडी शेल्फवरील रंगीबेरंगी परफ्यूमच्या बाटल्यांवर गेलं. त्यांनी एक-एक करून नावं वाचल्यावर त्यामध्ये अनेक ब्रँड्सचा समावेश असल्याचं समोर आलं.

मिस डायर (Miss Dior), जॉय बाय डायर (Joy by Dior), जो मालोन (Jo Malone), जियोर्जियो अरमानी सी (Giorgio Armani Si), झारा (Zara) अशा महागड्या ब्रँड्सचे परफ्यूम पाहून स्वतः चेतन आनंदही अवाक झाले.

एवढे महागडे परफ्यूम गार्डकडे आले कुठून?
गार्डकडे हे कलेक्शन कसे आले, असा प्रश्न चेतन यांनी विचारल्यावर त्यांनी सहजपणे संपूर्ण घटना सांगितली. इमारतीत राहणारी एक व्यक्ती अलीकडेच आपली खोली रिकामी करून दुसरीकडे राहायला गेली आणि जाताना तिने आपले सर्व परफ्यूम गार्डला भेट म्हणून दिले.

हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून त्यावर भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने “भावाकडे तर आपल्या सगळ्यांचे ड्रीम कलेक्शन आहे,” अशी कमेंट केली. तर दुसऱ्याने “कदाचित कोणीतरी गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी हे परफ्यूम घेतले असतील आणि नंतर गार्डला देऊन टाकले,” असा मजेशीर अंदाज वर्तवला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close