राष्ट्रीय

तुम्हीही पित असाल बाटलीबंद ( मिनरल वॉटर) पाणी तर ही बातमी वाचाच

Spread the love

बिसलेरी चे नमुने दोनदा फेल

कॅन्सर चा धोका असणारे पदार्थ आढळले

             सध्या बाटलीबंद पाण्याचे भरपूर क्रेझ आहे. लग्न समारंभा पासून तर प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमात बाटलीबंद पाणी पहायला मिळते. बाटलीबंद पाणी कुठल्याही कार्यक्रमात ठेवणे हा एक प्रकारचा स्टेटस सिम्बॉल झाला आहे.पूर्वी मोजके लोक बाटलीबंद पाणी पित होते.पण अलीकडे एखाद्या गाव खेड्यातील माणूस देखील एक १० रु.खर्च करून बाटलीबंद पाणी घेतो. बाटलीबंद पाणी हल्ली अनेक नावाने विकल्या जात आहे.पण काही काळापूर्वी बिसलेरी हा एक ब्रांड होता.आणि लोकं त्याच ब्रांड चे पाणी मागत असत.परंतु आता हीच बिसलेरी आरोग्याला अपायकारक ठरणार आहे.कारण दोनदा बिसलेरी चे नमुने फेल ठरले आहेत.

 देशातील सर्वात प्रसिद्ध बिसलेरी कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. खाद्य पदार्थांचे सुरक्षा पाहणारी सरकारी संस्था FSSAI ने रविवारी बिसलेरीच्या विरोधात कोर्टात केस चालवण्यास मंजूरी दिली आहे.

कारण या बाटलीबंद पाण्याचे नमूने दोनदा चाचणीत फेल झाले आहेत. याचा अर्थ बिसलेरीचे पाणी पिण्याच्या लायक नसल्याचे या तपासणीत आढळले आहे.

 

पहिल्या चाचणीत पाण्यात आरोग्यासाठी धोकादायक मानले जाणाऱ्या ब्रोमेटची पातळी परवानगी असलेल्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे आढळले. कंपनीने यावर आक्षेप घेतला आणि दुसरी चाचणी घेण्यात आली, परंतु त्यातही पाणी असुरक्षित असल्याचे आढळले. यावेळी, पीएएच (PAHs) नावाचे कर्करोग-कारक घटक देखील पाण्यात आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे, पाण्याचे नमुने बाजारातून नव्हे, तर बिस्लेरीच्या आवारातून गोळा करण्यात आले होते.

बिस्लेरीचे पाणी पिण्यास अयोग्य – FSSAI

ब्रोमेट आणि पीएएच (PAHs) या दोन्हींना कर्करोग-कारक पदार्थ म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले आहे. बिस्लेरीवरील कारवाईबाबत, एफएसएसएआयने म्हटले आहे की हे पाणी पिण्यास अयोग्य आहे आणि अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ अंतर्गत कंपनीवर गुन्हा दाखल केला जाईल. मात्र, या कंपनीने याबद्दल त्यांची बाजू मांडलेली नाही.

 

५० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या ब्रँडवरील कारवाईने लोकांना धक्का बसला आहे. मात्र, एफएसएसएआयने केवळ बिस्लेरीवरच नव्हे, तर इतर कंपन्यांवरही कारवाई केली आहे. FSSAI ने वसंत मसाला प्रायव्हेट लिमिटेड, टिट-बिट फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मीमांसा इंडस्ट्रीज, आणि आशा कन्फेक्शनरी आणि इतर काही खाद्य कंपन्यांविरुद्धही गुन्हे दाखल केले आहेत आणि उत्पादने बाजारातून परत मागवण्याचे आदेश जारी केले आहेत.

अनेक कंपन्यांचे परवाने निलंबित

नियमांचे पालन न केल्यामुळे FSSAI ने उर्मी लाइफसायन्स आणि गौर आयुर्वेदिक स्टोअर यांचे परवाने निलंबित केले आहेत. FSSAI ने आशा कन्फेक्शनरीविरुद्ध उत्पादन परत मागवण्याचा आदेश जारी केला असून, त्यांची चॉकलेट भरलेली प्री-पॅकेज्ड बिस्किटे असुरक्षित आढळल्याने कंपनीला ती परत मागवण्याचे निर्देशही दिले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close