राष्ट्रीय

सुवेंद्रु अधिकारी सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय 

Spread the love

पश्चिम बंगाल /विशेष प्रतिनिधी

               पश्चिम बंगाल मध्ये सुवेंद्रु अधिकारी यांची सरकार आल्यावर अनेक बदल पाहायला मिळत आहे. हे सरकार एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेत आहेत. आता सुवेंद्रु सरकार ने जो निर्णय घेतला आहे त्यामुळे पुन्हा तृणमूल काँग्रेस (ममता बॅनर्जी) पक्ष आणि सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांमध्ये वाद उफाळण्याची चिन्हे दिसत आहे.

या निर्णयामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आता मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

पश्चिम बंगालच्या नामांतराबाबत मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी एक घोषणा केली आहे. पश्चिम बंगालला आता इंग्रजीतही ‘पश्चिम बंग’ असं संबोधलं जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी आज (२३ नोव्हेंबर) दिली आहे.

सध्या पश्चिम बंगालला इंग्रजीत ‘वेस्ट बंगाल’ असं संबोधलं जातं. पण आता या नावातील बदल करून पश्चिम बंगालला आता इंग्रजीतही ‘पश्चिम बंग’ असं संबोधलं जाईल, यासाठी सरकार लवकरच विधानसभेत प्रस्ताव मांडणार असल्याचं सुवेंदू अधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी काय म्हणाले?

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी घोषणा केली की राज्य सरकार आता वेस्ट बंगाल ऐवजी ‘पश्चिम बंग’ या नावाचा वापर इंग्रजीत देखील करणार आहे. त्यासाठी योग्य तो प्रस्ताव लवकरच विधानसभेत मांडला जाणार आहे. दरम्यान, राज्याचं नाव बदलण्याचा हा नवा प्रयत्न असून याआधीही ममता बॅनर्जी यांनी ‘बांगला’ करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नव्हता.

“आम्ही आमच्या राज्याचं (पश्चिम बंगाल) नाव इंग्रजीतही अगदी तसंच लिहू जसं आम्ही बंगाली भाषेत लिहितो. म्हणजेच ‘पश्चिम बंग’. आम्ही ९ डिसेंबर रोजी पश्चिम बंगालच्या विधानसभेत यासंदर्भात एक ठराव मांडणार आहोत आणि त्यानंतर हा ठराव आम्ही केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत”, असं मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, २० जुलै १९९९ रोजी विधानसभेत एक प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यामध्ये राज्याचं नाव सर्व भाषांमध्ये ‘वेस्ट बंगाल’ असंच कायम ठेवण्याचं सुचवण्यात आलं होतं. पण चर्चेनंतर असा सूर उमटला होता की, वेस्ट बंगाल पेक्षा ‘बंगला’ हे नाव अधिक स्वीकारार्ह ठरेल. मग त्यानंतर तत्कालीन सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस व तृणमूल काँग्रेसने या प्रस्तावात सुधारणा सुचवल्या होत्या. पण त्यानंतर त्या प्रस्तावाबाबत काहीही होऊ शकलं नाही. तसेच ममता बॅनर्जी यांनी देखील त्यांच्या सत्तेतील दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला राज्याचं नाव बांगला करण्यासाठी विधानसभेत एक ठराव मांडला होता. पण केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close