क्राइम

प्रेयसीची हत्या करून रात्रभर होता तिच्या मृतदेहाशेजारी बसून

Spread the love
 
सकाळी स्वतःच लावला पोलिसांना फोन 
हिंजवडी / क्राईम रिपोर्टर

पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडीत प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यात प्रियकरानेच आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हादरवणारी बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकर रात्रभर प्रेयसीच्या मृतदेहाशेजारी बसून होता. यानंतर त्याने स्वत:च पोलिसांना फोन करुन आपण हत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणीला रुग्णालयात नेलं. पण तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडीत प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोमल डहाळे असं प्रेयसीच नाव आहे. तर शुभम ज्ञानेश्वर कालबांडे अशी आरोपीची  ओळख पटली आहे. हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते एकत्र राहत होते. दोघांच्या लग्नालाही कुटुंबीयांची संमती होती. मात्र, शुभमचे दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादातून शुभमने कोमलला डोक्यावर आणि गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत कोमलचा मृत्यू झाला.

धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर शुभम रात्रभर कोमलच्या मृतदेहाशेजारी बसून होता. सकाळी त्याने स्वतः 112 क्रमांकावर फोन करून हत्येची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कोमलला रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी शुभमला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close