सामाजिक

मुर्तिजापूर येथे शासकीय तंत्रनिकेतन उपजिल्हा रुग्णालया सह अनेक शाळांमधे झाला योग दिन साजरा ….

Spread the love

 

नव प्रहार / प्रतिनिधी

अनिल डाहेलकर

मुर्तिजापूर : येथील पाॅलिटेक्नीक काॅलेज मधे योग सत्र प्रशिक्षक डाॅ सौ सुजाता मुलमुले व सौ सुप्रिया कंझरकर यांच्या उपस्थित तसेच लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात मनीष जमादार सौ अनघा खानझोडे यांच्या उपस्थित योग दिन जाजरा करण्यात आला .

नगरपालिकेत योग दिवस साजरा करण्याकरीता आमदार हरीशभाऊ पिंपळे, सीओ टाले सर , माजी नगराध्यक्ष सौ मोनाली ताई गावंडे , क्रिडा अधिकारी संकुलाच्या वतीने काळबांडे सर महिला संगठन पतंजली चे पदाधिकारी उपस्थित होते .

स्थानिक जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मूर्तिजापूर येथे जागतिक योग दिनाचे औचित्य साधून शाळेत विविध प्रकारे चे योगासने प्राणायाम याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री कळंब सर तसेच धाये सर महामुने बाबू साहेब राहुडकर मॅडम गोरले बाई सगणे मावशी व विद्यार्थी हजर होते .

परमानंद मालाणी स्कुल मधे सौ.चैताली कावलकर यांच्या सह सौ. मुलमुले यांच्या मार्गदर्शनात तर सेंट झेवियर्स स्कुल सौं. संध्याताई दुबे , सौं सुप्रिया कंझरकर यांच्या पुढाकारानत तथा आय.टी.आय काॅलेज, संत गाडगे महाराज विद्यालय मुर्तिजापूर , लखमाई फाऊंडेशन सौ. चावरे, मेस्का माता मंदिर सौ. सेलवंटे, बदरिया,भीमनगर सौ. छाया डोंगरे , पांडे लेआउट सौ.तिडके,सौ.बनसोड आदींनी योग दिन साजरा करण्यात सहभाग नोंदवला , तर तहसील ग्राऊंड, जेबीस्कुल, सरलाताई काकाणी स्कुल यशस्वीतेसाठी क्रिडा.विभाग,अभाग्रापंचायत, नेहरु युवा मंडल , मुर्तिजापूर , विमा विभाग पतंजली योग शिक्षक/प्रभारी गण डाॅ सौ सुजाता मुलमुले,सौ बनसोड ताई, सौ.कावलकर,सौ.तिडके,गवळी,सौ खानझोडे, सौ,हांडे,सौ.सरोदे,सौ मोनाली गावंडे,कु भटकर ,मनीष जमादार, विलास नसले , दिनेश श्रीवास, बोयतदादा यानी सहकार्य केले .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close