अंजनगाव सुर्जी नगरपरिषद व तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात संपन्न
आ.गजानन लवटे यांनी लावली उपस्थिती
अंजनगाव सुर्जी /प्रतिनिधि
आज एक मे महाराष्ट्र दिन,संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तसेच महाराष्ट्र दिनी अंजनगाव सुर्जी शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात शासकीय असो वा निमशासकीय कार्यालय असो महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.नगरपरिषद अंजनगाव सुर्जी येथे नगरपरिषद च्या भव्य मैदानात प्रशासकीय अधिकारी मुख्यधिकारी दादाराव डोलारकर यांच्याकडून तर तहसील कार्यालय येथे नवनिर्वाचित दर्यापूर अंजनगाव विधानसभेचे आमदार गजानन लवटे यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी अंजनगाव पोलीसाकडून यांनी सलामी देऊन आमदार यांना झेंडावंदन करण्यास अनुमती देवून ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी तहसीलदार पुष्पा सोळंके (डाबेराव ),आमदार लवटे,भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी,तहसील कार्यालयाचे कर्मचारी,माजी आमदार रमेश बुंदिले,नगरपरिषद मुख्यधिकारी दादाराव डोलारकर व नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी सुनील उमक व नगरपरिषदेचे कर्मचारी,तसेच गावातील ज्येष्ठ पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील नागरिक व पक्षाचे कार्यकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,यावेळी तहसीलदार सोळंके तसेच आमदार गजानन लवटे व मुख्य अधिकारी दादाराव डोलारकर नगर परिषद यांनी सर्व जनतेंना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यानिमित्त चहा पान आयोजीत करुन तालुक्यातील तसेच शहरातील विकास कामाबद्दल चर्चा सुद्धा करण्यात आली.त्यामुळे या कार्यक्रमाला चांगला प्रकारे उस्फुर्त जनतेचे सहकार्य लाभले.