पोलिसात तक्रार
गोंदिया / प्रतिनिधी
टोमॅटो चे भाव गगनाला भिडले आहेत. 15 ते 20रु कीलो मिळणारे टमाटर 100 ते 120 रु किलो विकल्या जात आहे. त्यामुळे मागील काही काळापूर्वी ताटातून आणि सलाड मधून गायब झालेल्या कांद्या प्रमाणे आता टमाटर देखील गायब झाले आहेत. अश्यातच विक्री साठी आणलेल्या 20 कॅरेट टोमॅटो ची चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे.
महाराष्ट्रातील गोंदियामध्ये टोमॅटोच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेले 20 कॅरेट टोमॅटो चोरून नेले. एवढेच नाही तर या वेळी चोरट्यांनी वजनकाटाही पळवून नेला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
सध्या देशासह जिल्ह्यात टोमॅटो 120 ते 150 रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे तो ताटांमधून गायब होत आहे. शहरातील बाजारपेठेत गुरुवारी व्यापारी गगन गंगभोज यांनी 20 कॅरेट टोमॅटो विक्रीसाठी आणले. मात्र मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 20 कॅरेट टोमॅटो चोरून नेले. यादरम्यान चोरट्यांनी विद्युत काटाही नेला.