अंगणवाडीच्या बांधकामात भ्रष्टाचार, इस्टिमेट नुसार बांधकाम झाले नसल्याचे चिकणी (डो.) येथील ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप, नाल्याकाठी अंगणवाडी बांधल्याने चिमुकल्याच्या जीवाला धोका,गटविकास अधिकारी भ्रष्टाचारी, कारवाईची मागणी.

नेर :- नवनाथ दरोई
राज्य शासनाच्या झेप उपकृत अंतर्गत नेर तालुक्यातील चिकणी (डों) येथे अंगणवाडीच्या बाधकामासाठी शासनाकडून 11 लाख 25 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला.निधी मंजुरीनंतर अंगणवाडीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. अंगणवाडीचे सुरु असलेले बांधकाम हे निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचे तेथील ग्रामपंचायतच्या सदस्याच्या लक्षात येताच, तेथील ग्रामपंचायतच्या सदस्या महानंदा ढगाले यांनी 15 मार्च 23 ला गटविकास अधिकारी यांना लेखी तक्रार करून अंगणवाडीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे कळविले. व या बांधकामाची तातडीने चौकशी करण्याचेही मागणी तक्रारीतून करण्यात आली. परंतु गटविकास अधिकारी यांनी या तक्रारीकडे दुलंक्ष करत संबंधित कट्रागदाराला 11 लाख 25 हजार रुपयांचे देयक तातडीने वितरण केले असल्याने यामध्ये गटविकास अधिकारी भ्रष्ट असल्याचा तेथेच ग्रामस्थाचे म्हणणे आहे. इस्टिमेट मध्ये अंगणवाडीला पाच बाय चार फुटाची खिडकी असताना त्या ठिकाणी अडीच बाय तीन ची खिडकी बसविण्यात आली. चिमुकल्याना आत बाहेर येण्या,जाण्या करीता साडेतीन बाय सात फुटाचा दरवाजा असताना अडीच बाय सहाचा दरवाजा बसविण्यात आला. संडासचा खड्डा करण्यात आलाच नाही. अंगणवाडी ही नाल्याच्या सासलेल्या घाण पाण्याजवळ बांधण्यात आली. या साचलेल्या घाण पाण्यामुळे डेंगू डाससाची ऊत्पत्ती मुळे चिमूकल्याच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या अंगणवाडीचे तेथून स्थानांतरण करण्यात यावे अशी चिकणी डोमगाव येथील ग्रामस्थांची व ग्रामपंचायत सदस्याचे मागणी आहे.