सामाजिक

घाटंजी भाजपा महिला आघाडीचा सामूहीक रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न.

Spread the love

सरकारी दवाखाना व पुलिस कर्मचारी यांना राखी बांधून जपली सामाजिक बांधिलकी.

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार

बहीण -बंधू प्रेम हे नातेच जगावेगळे आहे. या नात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते व हातावर रेशमी धाग्याचे बंधन बांधत आपले प्रेमसंस्कारमुळे या रेशीम बंधाच्या माध्यमातून भावाला संदेव संकटातून दूर ठेवो ही ईश्वरास प्रार्थना करते त्याच प्रमाणे बहिणीला तीचा रक्षणाची जबाबदारी भाऊघेत खंबिरपणे संदेव बहिणीच्या पाठीराखा म्हणून निभवण्याच वचन देतो.अशा विश्वासच्या नात्यातील अतुटता कायम आबादीत रहावी यासाठी घाटंजी भाजपा महिला आघाडीच्या वतीने सरकारी दवाखाना व पोलिस स्टेशन येथील कर्मचारी वर्गास राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम महीला बहीणींनी साजरा केला.सदर कार्यक्रम घाटंजी शहर महिला आघाडी अध्यक्षा सौ.रिनाताई विजयकुमार धनरे यांच्या नेतृत्वात, दि.02/09/2023 रोजी घाटंजी पोलीस स्टेशन व ग्रामीण रुग्णालय येथे पार पडला, यात भाजपा महिला आघाडीतील सौ.राधिका गुंडावार,सौ.प्रतिभा देशपांडे,सौ.सुलोचना तोडसाम, सौ.लता ठाकरे, सौ.मंगलाताई खांडरे,व सौ.वृंदा कटकमवार यांचा सहभाग होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close