हटके

समुद्र किनारी लाटेचा आनंद घेत असलेली तरुणी  लाटेत वाहून गेली 

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया नेटवर्क

          पावसाळ्यात पर्यटनस्थळी वसुंधरा हिरवा शालू पांघरत असल्याने तीच्या सौंदर्यात आणखी भर पडते. आणि त्याठिकाणी जाण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. आणि अश्यातच थोड्याश्या आसावधनतेने दुर्घटना घडतात. ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अशीच एक घटना घडली आहे. त्या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात समुद्गतील लाटांचा आनंद घेत असलेली एक तरुणी लाटेसोबत वाहून गेली पण ……

हृदयाचा ठोका चुकवणारं हे दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणीनीसोबत पुढे काय घडतं तिला कसं वाचवलं जातं याविषयी पाहुया.समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी समुद्रकिनारी लाटांचा आनंद लुटताना दिसत आहे. आजुबाजूला इतरही पर्यटक दिसत आहेत.

लाटेच्या वेगामुळे तरुणी अचानक समुद्राच्या पाण्यात पडते. लाटांसोबत ती पुढे मागे तरंगू लागते. सुदैवानं तिला लवकर रेस्क्यू करण्यात येतं. थोडासाही उशीर झाला असता तर ती समुद्राच्या भरतीच्या पाण्यात पाहून गेली असते. हे दृश्य पाहून हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही Insane Reality Leaks (@InsaneRealitys) August 17, 2023तरुणीचा हा धोकादायक व्हिडीओ @InsaneRealitys नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 53 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close