हटके

बायकोची मागणी पूर्ण करण्यासाठी तो खाली उतरला अन ……

Spread the love

शाहबाद / नवप्रहार मीडिया 

                    लग्न झालेल्या तरुणाला काही कामासाठी बाहेरगावी जावे लागल्याने त्यांनी बायकोला बहिणीच्या येथे सोडले. परततांना त्याने बायकोला ओबात घेतले.परतीच्या प्रवासाला निघालेल्या बायकोने नवऱ्याकडे एका गोष्टीची मागणी केली. ती पूर्ण करण्यासाठी तो बस च्या खाली उतरला आणि परतला तेव्हा बायको सीटवर नव्हती.  त्यामुळे त्याला धक्का बसला सत्य समजल्यावर त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की ,शाहबाद शहरात राहणाऱ्या मेहबूबचे 15 फेब्रुवारी 2020 रोजी बरेली जिल्ह्यातील सिरौली येथील शाईन हिच्याशी विवाह झाला. शाईनला लग्नात सोन्या-चांदीचे दागिने देण्यात आले. लग्नानंतर काही दिवसांनी मेहबूब याला कामानिमित्त प्रयागराजला जावे लागले. त्याने शाईनला सोबत घेतले आणि त्याच्या बहिणीच्या घरी सोडले. प्रयागराजहून परत आल्यावर पत्नी शाइनला सोबत घेऊन तो पुन्हा रामपूरला येत होता.

मेहबूब आणि शाईन दोघेही बसमध्ये बसले होते. वाटेत शाइनने मेहबूबकडून पेस्ट्री खाण्याची इच्छा व्यक्त केली. मेहबूब पत्नीसाठी पेस्ट्री घेण्यासाठी खाली उतरला. पण तो पेस्ट्री घेऊन परत आला तेव्हा शाईन बसच्या सीटवरून गायब झाली होती. शाईन हिने १५ हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पळ काढला. पत्नीने आपली फसवणूक केल्याचा आरोप मेहबूबने केला.

विवाहित असूनही तिने सैफनी येथील रहिवासी इस्लाम याच्यासोबत दुसरे लग्न केले. हे माहित होताच त्याने संबंधित व्यक्तीचे घर गाठून पत्नीकडे दागिने आणि रोख रक्कम मागितली. मात्र, त्याची पत्नी आणि तिचा दुसरा पती इस्लाम शाहिद याने त्याला मारहाण केली. याबाबत मेहबूब पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेला. मात्र, पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे मेहबूबने कोर्टात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close