जागतिक वसुंधरा दिन उत्साहात साजरा
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोलेO
आर्वी : स्थानिक नगरपरिषद गांधी विद्यालयामध्ये दिनांक 20 एप्रिल पासून दहा दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या आयोजनामध्ये विविध प्रकारचे व्यायाम योगा प्राणायाम आणि खेळाचे प्रशिक्षण दिले जात आहे 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शिबिरातील सर्व विद्यार्थ्यांनी सायकलने आर्वी जवळील सारंगपुरी तलाव येथे दिनांक 23 एप्रिल रविवारी सकाळी 6.30 वाजता जाऊन जागतिक वसुंधरा दिन साजरा केला.
वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. असे शिबिर राजे आयोजक तसेच एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले विद्यार्थ्यांनी जवळपास सहा किलोमीटर पर्यंत जंगल भ्रमंती करून आपण नैसर्गिक निसर्गाचे कशाप्रकारे रक्षण करू शकू तसेच प्राणी मित्र श्री मनीष ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना विविध पक्षांची तसेच प्राण्यांची माहिती दिली स्थलांतरित होणारे पक्षी यांचे सुद्धा सखोल माहिती दिली शाळेची ज्येष्ठ शिक्षक संजय किटे हे सुद्धा या उपक्रमांमध्ये सहभागी होते विद्यार्थ्यांना सायकलींग तसेच जागतिक वसुंधरा दिनानिमित्त केलेली जंगल भ्रमंती आणि सारंगपुरी तलावाचे महत्त्व आपल्या पर्यावरणाचे महत्त्व हे प्रत्यक्ष कृतीतून या ठिकाणी समजले. विद्यार्थ्यांमध्ये एनसीसी छात्र सैनिक तसेच स्टुडन्ट पोलीस कॅडेट आणि इतर विद्यार्थी सहभागी होते ज्यांनी भविष्यामध्ये आपण पर्यावरणाची रक्षण करू असे आश्वासन दिले