हटके

हनिमून च्या रात्री नववधू आरडाओरडा करत रूम मधून आली बाहेर 

Spread the love

एटा / नवप्रहार मीडिया 

          युपी च्या एटा मधून ऐक अजबगजब प्रकरण समोर आले आहे. मधुचंद्राच्या रात्रीच नवविवाहिता रूम मधून बाहेर आल्याने घरातील मंडळीला धक्का बसला. पण मुली कडील लोकांना जेव्हा सत्यता माहीत पडली तेव्हा मात्र मुलाकडील लोकांनी आपली फसगत केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

          ऐका वयात आल्या नंतर मुली कडील आणि मुला कडील मंडळी आपल्या मुलांसाठी योग्य जोडीदारा साठी पायपीट करीत असतात. मुली देखील आपल्या भावी पतीला घेऊन अनेक स्वप्न रंगवत असतात. पण पत्नीला पहिल्याच दिवशी जर समजले की तिचा पती नपुंसक आहे. आणि सासरच्या मंडळीने तिच्या आणि कुटुंबीयां पासून हे लपवून ठेवले आहे तर तिच्यावर काय परिणाम होईल.  असाच प्रकार ऐका तरुणी सोबत घडला आहे . मधूचंद्राच्या रात्री खुलासा झाल्यानंतर, वधूचे स्वप्न क्षणात भंगले.

वधू आरडा-ओरड करत रूममधून बाहेर आली. तिने कुटुंबातील लोकांना संपूर्ण प्रकार सांगितला. याप्रकरणी वधूच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपी पतीसह तिच्या सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी एटा जिल्ह्यातील मिरहची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेने न्यायालयात केलेल्या अर्जानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात म्हणण्यात आले आहे की, “बुलंदशहरातील अहमदगड येथील एका तरुणासोबत 11 जून 2022 रोजी आपला विवाह झाला. यात 6 लाख रुपये रोख आणि 4 लाख रुपयांचे साहित्य देण्यात आले होते. वधू जेव्हा सासरी पोहोचली, तेव्हा मधूचंद्राच्या रात्री, आपला पती नपुंसक असल्याचे तिच्या लक्षात आहे.

महत्वाचे म्हणजे, सासरच्या लोकांनी आपल्या घरच्यांना खोटी माहिती देऊन हे लग्न लावले, असा आरोप वधूने केला आहे. दरम्यान, आम्ही उपचार घेऊ आणि सर्व व्यवस्थित होईल, असे चिच्या पतीच्या घरच्यांनी म्हटले आहे. संबंधित महिलेने म्हटले आहे की, ती 2 महिन्यांनंतर आपल्या कुटुंबीयांसह पुन्हा एकदा सासरी जाऊन पतीला भेटली होती. मात्र, उपचारानंतरही कसल्याही प्रकारचा फायदा झाला नाही. यावर, सासरच्यांकडे हुंडा आणि रोख देण्यात आलेले पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली. यावर सासरच्या लोकांनी धमकी देत घरातून हकलून लावले.

यानंतर, संबंधित महिला थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. मात्र, तिचे ऐकूण घेण्यात आले नाही. यावर तिने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यावर, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close