वांगचुक त्यांना ट्रोल करणाऱ्यांवर प्रचंड संतापले ; बघा काय म्हणाले वांगचुक


२६ दिवसांपासून नीट पेपर फुटी प्रकरणावरून अन्नत्याग आंदोलनावर असलेल्या सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या हाताने चाय पित उपोषण सोडले आहे. राजकीय व्यक्तीच्या हाताने उपोषण सोडल्यामुळे काही लोक त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करत आहेत. त्यावर वांगचुक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत या ट्रोलिंग का उत्तर दिले आहे.
त्यांनी विचारले, “२६ दिवसांच्या उपवासानंतर आता मला काय सिद्ध करायचे आहे?मी उपवास सोडल्याबद्दल इतके प्रश्न का विचारले जात आहेत?” या व्हिडिओद्वारे, त्यांनी उपवास सोडल्याबद्दल त्यांना ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
सोनम वांगचुक म्हणाले की, “२० व्या आणि २२ व्या दिवशी, मला त्या मुलांशी शारीरिक झटापटी करावी लागली, संपातच दुसरा संप करावा लागला, जमिनीवर झोपावं लागलं आणि स्वतःला त्यातून बाहेर काढण्यासाठी माझ्यातली सगळी शक्ती वापरावी लागली. तुम्हाला कल्पना नाही. मी हा व्हिडिओ आता धक्का, दुःख आणि रागाच्या भावनेने बनवत आहे. माझं ११ किलो वजन कमी झालं आहे.
ते म्हणाले की, लडाखच्या कडाक्याच्या थंडीपासून ते दिल्लीच्या भाजून काढणाऱ्या उन्हापर्यंत, हे सगळं सहन केल्यानंतर, माझा उपवास किती पवित्र होता हे सिद्ध करण्यासाठी मला कोणाकडून चारित्र्य प्रमाणपत्राची गरज आहे का? सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओ संदेशात वांगचुक म्हणाले की, त्यांच्या उपोषण सोडण्याच्या निर्णयाकडे राजकीय अटकळींच्या दृष्टिकोनातून पाहू नये, तसेच त्यांनी सरकारशी तडजोड केल्याच्या आरोपांवर नाराजी व्यक्त केली.
सोनम वांगचुक यांनी लोकांना कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरील संपूर्ण २२ मिनिटांचा व्हिडिओ पाहण्याचे आवाहन केले आणि त्याचा संदेश पसरवण्यासाठी मदत करण्याचे आवाहनही केले. कोणाचेही नाव न घेता, वांगचुक यांनी केंद्रासोबत आपला समझोता झाल्याचा आरोप करणाऱ्यांवर निशाणा साधला. म्हटले की, असे आरोप आपल्या आंदोलनामुळे झालेल्या वैयक्तिक नुकसानीकडे दुर्लक्ष करतात.
सोनम वांगचुक म्हणाले, “मी जर माझं उपोषण सोडलं, तर तो कोणासोबत सोडलं? मी त्यांच्यासोबतच का सोडलं? ह्या व्यक्तीसोबत का नाही सोडलं? काय सौदा झाला होता? मला या सगळ्याची उत्तरे द्यावी लागतील. कालपासून मी द्रव आहार घेत आहे, ज्यामुळे माझ्या शरीरात थोडी ऊर्जा परत आली आहे. सकाळपासून लोक मला फोन करत आहेत किंवा पोस्ट दाखवत आहेत की तुमच्यावर खूप प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तुम्ही केंद्रीय मंत्र्यांकडून उपोषण का सोडलं? तुम्ही दुसऱ्या कोणाकडून का नाही सोडलं?”
ते पुढे म्हणाले की, “जर मला सौदा करायचा असता, तर मी २६ दिवस उपाशी राहिलो असतो का? किती जणांनी सौदे केले आहेत? ते असे सौदे करतात का? आलिशान खोल्यांमध्ये बसून सौदे केले जातात. अशा प्रकारची मने निर्माण करणाऱ्या देशाला लाज वाटायला हवी, ज्यातून असे नीच विचार जन्माला येतात.”




