क्राइम

ट्रान्सफॉर्मर मधील तांबे चोरून विकणाऱ्या आंतरराज्यीय चोराला तळेगाव पोलिसांकडून अटक

Spread the love
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
                       तळेगाव दशाशर पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची तार चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगाराला अटक केली आहे. जितेंद्रसिंग संतोषसिंग टाक वय 34 वर्षे रा.अलाना गेवराई ता. जि. छत्रपती संभाजीनगर असे आरोपीचे नाव आहे.
दिनांक 22/08/206 रोजी पोलीस स्टेशन तळेगांव दशासर येथे फिर्यादी नामे राजेश अशोक चांडक वय 41 वर्षे रा. पुलगांव ता. देवळी जि. वर्धा यांनी तक्रार दिली की, त्यांचे पत्नीचे नावे साई मोहिनी क्वॉट्स वर्ल्ड नावाची जिनींग फॅक्टरी असुन सदर जिनींगचे लाईन सप्लायकरीता 630 के.व्हि. क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर जिनींग समोरील आवारात लावलेला असुन दिनांक 17/08/2026 रोजी रात्री 12/30 वा.ते 06/00 वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने नमुद ट्रान्सफॉर्मर फोडुन त्यातील कॉपर कॉईल चोरुन नेला. अशा फिर्यादीचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन तळेगांव दशासर येथे अपराध क्रमांक 205/2026 कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन तळेगांव दशासर येथील पथक तपास करीत असतांना त्यांना गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहिती वरुन तपास पथकाने जितेंद्रसिंग संतोषसिंग टाक रा. अलाना गेवराई ता.जि.छत्रपती संभाजीनगर याचा अत्यंत शिताफीने पाठलाग करुन त्यास नेवासा जि. अहिल्यानगर येथुन ताब्यात घेवुन अटक करुन त्यास सदर गुन्ह्यासंबंधाने सखोल विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, मी व इतर साथीदारांसह माझे मालकीची मारोती सुझुकी बलेनो कार क्रमांक MH 21 BF 7195 ने ग्राम देवगांव येथे घटनास्थळी येवुन तेथे रेकी करुन नमुद ट्रान्सफॉर्मर फोडुन त्यातील कॉपर कॉईल चोरुन नमुद कार मध्ये टाकुन पळुन गेल्याची कबुली दिली.
पोलीस स्टेशन तळेगांव दशासर तपास पथकाने पुढील तपास करुन गुन्ह्यात चोरी गेलेल्या मालापैकी 50 किलो कॉपर कॉईल किंमत 75,000/-रु चा मुद्देमाल आरोपीचे राहते गावातील परीसरातुन जप्त करुन ताब्यात घेतला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. दत्ता तोटेवाड साहेब व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग चांदुर रेल्वे श्री. गिरीष ताथोड साहेब यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक श्री. किरण औटे, ठाणेदार पोलीस स्टेशन तळेगांव दशासर यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन तळेगांव दशासर येथील पोउपनि स्वप्नील रणखांब, पोहेकॉ युवराज मानमोठे ब.नं. 1675, पोहेकॉ विनोद राठोड ब.नं. 1791, पोकों संदेश चव्हाण ब.नं. 788 व पोकों प्रितम यादव ब.नं.415 पोकों यशवंत काळे ब.नं 498 यांनी पार पाडली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close