CJP आंदोलनात जखमी त्या मुलीचा खरंच मृत्यू झालाय काय ?


सोशल मीडियावर पसरवण्यात येत असलेल्या खोट्या पोस्ट वर विश्वास ठेवू नका – दिल्ली पोलिस
नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी
काँक्रोच जनता पार्टी (CJP) कडून २० जुलै रोजी जंतर मंतर ते संसद भवन दरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चा वर करण्यात आलेल्या लाठीचार्ज मुळे आंदोलनात सहभागी अनेक लोक जखमी झाले आहेत. काल सोशल मीडियावर त्या जखमी तरुणीचा मृत्यू झाल्याची पोस्ट वेगाने व्हायरल झाली आहे आणि होत आहे. दिल्ली पोलिसांच्या मते तिच्यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट वर सहज विश्वास न ठेवता त्याच्या आधी शहानिशा करा.असे आवाहन दिल्ली पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या लाठीचार्ज मध्ये जखमी साक्षीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबाबत आता दिल्ली पोलीसांनी खरी माहिती समोर आणली आहे.
दिल्ली पोलिसांनी नुकत्याच केलेल्या घोषणेत नागरिकांना सोशल मीडियावर माहिती शेअर करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत जंतर मंतरवरील लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितलं.
दिल्ली पोलीस काय म्हणाले?
दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही इथं सांगू इच्छितो की जखमी झालेली महिला ही जिवंत असून ती सध्या राम मनोहर लोहिया रूग्णालयात दाखल आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचं अन् ती धोक्यातून बाहेर असल्याचं सांगितलं आहे.’
दिल्ली पोलीस आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणते की, ‘दिल्ली पोलीस नागरिकांना विनंती करते की सोशल मीडियावर माहिती पसरवताना किंवा माहिती पाहताना अतरिक्त काळजी घ्या. तुमच्या पर्यंत पोहोचलेली प्रत्येक माहिती विश्वासार्ह स्रोतांमार्फत तपासली पाहिजे.
20 जुलैला नेमकं काय झालं होतं?
हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार २१ वर्षाची साक्षी ही सोमवारी झालेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झाली होती. त्यानंतर तिला राम मनोहर लोहिया रूग्णालयात आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं होत. तिच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे.
हॉस्पिटलच्या बुलेटीनमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, ‘तिचा व्हेटिलेटर आता काढून टाकण्यात आला आहे. ती स्वतः श्वास घेत आहे. ती शुद्धीत असून सांगितलेल्या सुचनांना प्रतिसाद देत आहे. तिचा मेंदू आणि मज्जासंस्थेचा एमआरआय स्कॅन हा सामान्य आहे.’
20 जुलै रोजी काही लोक खाली पडल्यामुळं चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. साक्षी याच गर्दीत अडकली असता त्वरित तिला उचलले. दोन एमबीबीएस विद्यार्थ्यांनी तिला सीपीआर दिला. त्यावेळी त्यांनी ती गंभीर असल्याचं दिसत होती. ती व्यवस्थित प्रतिक्रिया देत नव्हती. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने तिला रूग्णालयात आणलं होतं. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.




