सप्टेंबर महिन्यासाठीच्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीने भरवली धडकी


बाबा वेंगा हे प्रसिद्ध भविष्यकार होऊन गेलेत. वयाच्या १२ व्या वर्षी दृष्टी गमावलेल्या बाबा वेंगा यांनी अनेक वर्ष आधी भविष्याचे भाकित केले आहे. त्यांच्या अनुयायानुसार त्यांच्या सगळ्याच भविष्यवाणी तंतोतंत ठरत आहेत. त्यांच्या २०२६ च्या भविष्यवाणीबाबदल विचार केला तर त्यांनी सप्टेंबर महिन्यासाठी एक खतरनाक भविष्यवाणी केली आहे.त्यांच्या मते या वर्षातील शेवटचे काही महिने पृथ्वी आणि मानवी संस्कृतीसाठी अत्यंत धोक्याचे ठरू शकतात.
निसर्गाचा प्रकोप आणि मोठा विनाश
2026 वर्ष संपेपर्यंत नैसर्गिक संतुलन पूर्णपणे बिघडू शकते. जगातील सुमारे 7 ते 8 टक्के भूभागावर अचानक विनाशकारी नैसर्गिक आपत्ती ओढावू शकते. विनाशकारी भूकंप, सुप्त ज्वालामुखींचा अचानक उद्रेक आणि अनपेक्षित पूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती येवू शकतात. जगभरात अनेक मोठ्या नैसर्गिक आपत्ती येवू शकतात. जगभरातील अनेक दाट लोकवस्तीच्या शहरांचा नकाशा बदलू शकते. लाखो लोकांच्या जीवनावर याचा परिणाम होवू शकतो असे भाकित बाबा वेंगाने वर्तवले.
जग तिसऱ्या महायुद्धाच्या उबंरठ्यावर
नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय राजकारणातही एका मोठ्या संकटाची शक्यता वर्तवली जात आहे. युरोप आणि आशिया खंडातील देशांमधील सध्याचा संघर्ष शिगेला पोहोचू शकतो. वाढता सीमा तणाव आणि राजनैतिक अडथळे जगाला एका नवीन महायुद्धाकडे, म्हणजेच तिसऱ्या महायुद्धाकडे ढकलू शकतात. या जागतिक संघर्षामुळे अनेक शक्तिशाली देशांमध्ये थेट लष्करी संघर्ष होऊ शकतो, ज्यामुळे जगभरात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होऊ शकते असे भाकित बाबा वेंगाने वर्तवले आहे.
परग्रहावरील जीवांशी संपर्क होणार, AI मानवावर नियंत्रण मिळवणार?
2026 च्या अखेरीस मानवाचा परग्रहावरील जीवांशी संपर्क होऊ शकतो असे भाकित बाबा वेंगाने वर्तवले आहे. पहिल्यांदाच मानवाचा परग्रहवासीयांशी सामना होईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI इतकी शक्तिशाली होईल की मानवांना तिला नियंत्रित करणे अशक्य होईल.
जागतिक अर्थ संकट
मोठं जागतिक अर्थ संकट निर्माण होऊ शकतं असं भाकित बाबा वेंगाने वर्तवले आहे. जगातील अनेक मोठ्या बँका दिवाळखोर झाल्यामुळे गंभीर आर्थिक मंदी येऊ शकते. कागदी चलनाचे मूल्य घसरल्यामुळे, लोक सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात सोने आणि चांदी खरेदी करतील , ज्यामुळे मौल्यवान धातूंच्या किंमती मागील सर्व विक्रम मोडतील.


