उदयपूर ( राजस्थान ) / नवप्रहार वृत्तसेवा
राजस्थान च्या उदयपूर जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. येथे रस्ता अपघातात पाच मित्रांचा मृत्यू झाला आहे. सुसाट जीप पलटी झाल्याने हा अपघात घडला आहे. यातील काही मित्र दारू प्याले असल्याचे समोर आले आहे. जीप मध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार घटना उदयपूर जिल्ह्यातील बेक्रिया ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मृतक एकाच जीप मध्ये होते. जीप सुसाट धावत असल्याने बोगद्या जवळ पलटी झाली आणि बऱ्याच दूर घासत गेली.मदत पोहचेपर्यंत तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर दोघांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी माहिती दिली की सगळे तरुण उदयपूर येथील आहेत. पूना गरासिया, मनोज गरासिया, नाथू गरासिया, भीमा गरासिया हैं अशी या मित्रांची नावे आहेत. तरुण आपल्या गावाकडे निघाले होते पण वाटेतच त्यांना मृत्यूने गाठले. तरुण कशासाठी आणि कुठे गेले होते याची माहिती कुटुंबियांकडून घेण्यात येत आहे.