अपघात

व्हॅन दरीत कोसळून १० लोकांचा मृत्यू ; सुटीत गेले होते फिरायला 

Spread the love
चेन्नई / विशेष प्रतिनिधी
तमिळनाडूतील वालपराईत
पर्यटकांची व्हॅन दरीत कोसळली. या दुर्घटनेत ९ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ४ जण जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
केरळमधील एका शाळेचे शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांचा ग्रुप कुटुंबियांसह पर्यटनासाठी तामिळनाडूला गेला होता. त्यांनी आधी अथिरापल्लीचा धबधबा पाहिला. यानंतर ते वालपराईला रवाना झाले होते. याच दरम्यान त्यांच्या व्हॅनला अपघात झाला. कोईम्बतूर जिल्ह्यात असलेल्या वेलपराईच्या डोंगराळ भागात ही दुर्घटना घडली. व्हॅनमधील सगळे जण केरळच्या मल्लपुरम भागाचे रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेलपराई-पोल्लाची हिल रोडजवळ एका वळणावर चालकाचं व्हॅनवरील नियंत्रण सुटलं. व्हॅननं आधी बॅरियरला धडक दिली. मग ती खोल दरीत कोसळली. अपघात अतिशय भीषण होता. या अपघातात व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकानं रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या अपघातात चालकासह अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती नाजूक आहे.
अपघातानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दुर्घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचाव कार्य तातडीनं सुरू करण्यात आलं. दरीतून शव बाहेर काढण्यात आले. जखमींना पोल्लाची सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. व्हॅनमधील काही प्रवासी मलप्पुरमच्या शाळेत अध्यापनाचं काम करायचे. शाळेला सुट्टी असल्यानं ते तामिळनाडूला फिरायला गेले होते.
अपघाताबद्दल समजताच शाळेत पालकांची आणि स्थानिकांची गर्दी जमली. एकूण १६ जण फिरायला गेल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भात केरलम पोलीस तमिळनाडू पोलिसांच्या संपर्कात आहेत. या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या. जखमींना लवकर आराम पडवा यासाठी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं. ‘हा अपघात अतिशय दुःखद आहे. जखमींना योग्य उपचार दिले आहेत,’ अशी माहिती विजयन यांनी दिली.
>
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close