क्राइम
एटीएम फोडणाऱ्या आरोपींना 22 मे पर्यंत पोलीस कोठडी
वरूड / मोर्शी – प्रतिनिधी
शनिवार दिनांक 20 मे रोजी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 12 मे रोजी जरूड येथील एसबीआयचे एटीएम मशीन फोडून 16 लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली होती . याप्रकरणी गुन्हे शाखा वरुड पोलिसांच्या मदतीने मध्य प्रदेश व हरियाणातून कैलास इंदल पाल व कालीराम लक्ष्मण नागले यांना अटक करण्यात आली होती. सदर आरोपींना शनिवारी वरुड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात वरुड पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना दिनांक 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
या कोठडीदरम्यान अन्य काही गुन्हे उघडकीस येऊ शकतील अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक प्रदीप चौवगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1