राजकिय

UBT गटाला धक्का ; उमेदवारी घोषित केलेल्या उमेदवाराने घेतली माघार 

Spread the love

छत्रपती संभाजी नगर / वि.प्र.

               राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. काल चे कट्टर वैरी आज मित्र आणि आजचे कट्टर मित्र आजचे पक्के वैरी  बनतात. छत्रपती संभाजी नगर मध्ये UBT गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. याठिकाणी उबाठा गटाकडून उमेदवारी दिलेल्या उमेदवाराने शिंदे गटाच्या उमेदवारा साठी उमेदवारी मागे घेत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाला यामुळे मोठा धक्का बसला आहे.

ठाकरे गटाचे औरंगाबाद मध्य मतदारसंघातील उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली आहे. 2014 सारखी परिस्थिती होऊ नये. दोघांच्या वादात एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ नयेत, यासाठी उमेदवारी मागे घेत असल्याचे तनवाणी म्हणाले आहे. या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

जलील विरुद्ध जैस्वाल

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात प्रदीप जैस्वाल विरुद्ध एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रदीप जैस्वाल यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवली आणि येथील जनतेने त्यांना विजयीही केले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत MIM पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले होते. अशा स्थितीत यावेळच्या विधानसभा निवडणुकीत शिनसेनाला अधिक संधी असल्याचे दिसते. मात्र दोन्ही शिवसेनेचे उमेदवार रिंगणात असतील तर मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा एमआयएमला होण्याची शक्यता होती.

अंबादास दानवे यांनी याबाबत म्हटलं की, किशनचंद तनवाणी यांनी अशी भूमिका का घेतली माहीत नाही. त्यांनी आग्रहाने उमेदवारी घेतली आहे. उमेदवारी मागून घेऊन अशी माघार घेणे मला चुकीचं वाटतं. किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली तरी आमच्याकडे पर्याय कमी नाही. तीन-चार जण इच्छूक आहेत. मात्र तनवाणी यांच्याशी बोलूनच पुढील निर्णय घेऊ.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close