राजकिय

मोदी पवार भेट , चर्चांना उधाण 

Spread the love
नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी
              सध्या महाराष्ट्रातच नव्हे  तर देशात राजकारणात कधी काय होईल याचा काहीच नेम नाही. अश्यातच राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे.आज दिल्लीत असलेल्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यात काय चर्चा झाली ? यांबद्दल अद्याप कुठलीही माहिती बाहेर आलेली नाही.
 राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा विलीनीकरण आणि शरद पवार गट हा NDA सोबत जाणार का, या चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवारांनी दिली होती जंतर मंतरला भेट
शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळी भेट दिली होती. त्यांनी आंदोलक अभिजीत दिपके सोबत संवाद साधला होता. त्यांनी आंदोलक आणि जखमी विद्यार्थांची विचारपूर केली होती.
विविध चर्चांना उधाण
राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. त्यांनी आपल्या मतदारसंघातील कामांसाठी त्यांना भेटल्याचे म्हटले होते. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरण, परिसीमन विधेयकाला पाठिंबा, त्यानंतर NDA मध्ये सहभागी होण्याच्या अनेक चर्चांना उधाण आले होते.
त्यातच आता शरद पवार आणि सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close