मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानने प्रवास , चर्चेला उधाण


‘आपण भेटलो, हीच मोठी बातमी’
राजकीय घडामोडींमध्ये वाढले महत्त्व
अलीकडेच शिवसेना (ठाकरे गट) मधील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
याच दौऱ्याचा भाग म्हणून 27 जून रोजी उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ-वाशीम दौरा असून त्यासाठी ते नागपूरला जात होते. योगायोगाने त्याच विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रवास करत असल्याने या भेटीची राज्यभर चर्चा रंगली आहे.
विमानात होते हे नेते
या विमानप्रवासात उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या अनपेक्षित भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले असले, तरी या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर सविस्तर चर्चा झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही




