क्राइम
पलकचा खुनी निघाला तिचाच प्रियकर


प्रियकराने अपघात दर्शविण्याच्या केला प्रयत्न पण पोलिसांनी तो हाणून पाडला
इंदूर /विशेष प्रतिनिधीं
ICIC बँकेत कर्मचारी असलेल्या पलक चा अर्धवट जळालेला मृतदेह तिच्या खोलीत आढळला होता. घर मालकाने याबद्दल पोलिसांना कळवले.पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरवात केली. पोलिसांना हा अपघात नसून खून असल्याचा संशय असल्याने त्यांनी तांत्रिक तपासाला सुरवात केली आणि पलक चा प्रियकर त्याच्या रडावर आला.
मूळची हरदा जिह्यातील टीमराणी येथील रहिवासी पलक इंदूर येथील ICIC बँकेत नोकरीला होती. आणि ती तपेश्वरी बाग कॉलनीत खोली भाड्याने घेऊन राहत होती. दरम्यान तिची ओळख कुलर मेकॅनिक असलेल्या मयंक शाक्य सोबत झाली. मागील सहा वर्षापासून मयंक आणि पलक मध्ये बोलणे सुरू होते.
रविवारी रात्री तिचं अर्धवट जळालेला शव किचनमध्ये आढळून आलं. स्वयंपाक करताना आग लागून तिचा मृत्यू झाल्याचं चित्र प्रथमदर्शनी दिसत होतं. दिसत होतं. गॅस शेगडीचा बर्नर वेगळा झाला होता, गॅस गळती होत होती आणि शेगडीवर चिरलेल्या भाज्या ठेवलेल्या होत्या. त्यामुळे सुरूवातीला हा अपघात असावा असं मानून तपास सुरू करण्यात आला होता.
आरोपीचा लग्नासाठी दबाव
मयंक हा पलकवर लग्नासाठी दबाव टाकत होता. मात्र तिने नकार दिल्यावर त्याने आधी तिला मारहाण केली. नंतर तिचा गळा आवळून खून केला. ही घटना अपघात असल्याचा भास निर्माण करण्यासाठी त्याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. तिची बॉडी स्वयंपाकघरात सोडून त्याने घटनास्थळावरून पळ काढला.
त्याला करायचे होते लग्न
मयंकला पलकशी लग्न करायचे होते, परंतु तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी हा प्रस्ताव नाकारला होता; तिचे कुटुंबीय तिच्यासाठी अन्यत्र योग्य जोडीदार शोधत होते. या गोष्टीचा राग आल्याने मयंकने तिला मारण्याचा कट रचला आणि पेट्रोलची बाटली घेऊन तिच्या घरी पोहोचला.
गळा आवळून हत्या
पोलिसांच्या माहितीनुसार, त्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला. त्यादरम्यान मयंकने पलकला जमिनीवर पाडून तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर ही घटना एक अपघात असल्याचे भासवण्याच्या उद्देशाने त्याने तिच्या बॉडीवर पेट्रोल ओतून त्याला आग लावली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
घरमालकाला आढळली अर्धवट जळालेली बॉडी
पलकचा तिच्या कुटुंबीयांशी दोन दिवसांपासून कोणताही संपर्क झाला नव्हता. तिचे वडील राधेश्याम यांनी तिला वारंवार फोन करूनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने, त्यांनी घरमालकाला तिची विचारपूस करण्यास सांगितले. घरात प्रवेश केल्यावर घरमालकाला पलकचं अर्धवट जळालेलं शव आढळून आल. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शवविच्छेदनासाठी तिची बॉडी ‘एमवाय’ रुग्णालयात पाठवली.
चेहरा झाकून घराबाहेर पडला
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले तेव्हा या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. फुटेजमध्ये एक तरूण चेहऱ्यावर कापड बांधून घाईघाईने बाहेर पडताना दिसला; त्याच्या पाठीवर एक बॅगही होती. त्यानंतर सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि लोकेशन डेटाचे विश्लेषण केले.या तपासामुळे मयंक शाक्य याची ओळख पटली. घटनेच्या वेळी त्याचे लोकेशन खजराणा भागात असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने डबरा येथे ताब्यात घेतले.
आरोपीने गुन्हा कबूल केला
चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज सिंग सेंधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक कुलर दुरूस्तीचे काम करतो. दोघांची भेट साधारण सहा वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि ते सतत एकमेकांच्या संपर्कात होते.माहितीच्या आधारे पोलीस पथकाने डबरा येथे छापा टाकून आरोपीला अटक केली.




