राजकिय

मनोज जरांगे पाटलाच्या घोषणेने सगळेच धास्तावले

Spread the love

आतरवली सराटी / नवप्रहार डेस्क 

मराठा नेता मनोज जरांगे यांनी जेथून निवडून यायची शक्यता आहे.त्याठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा जरांगे यांनी केली होती.  जिथं शक्यता कमी वाटते, तिथं जे उमेदवार आमच्या मागण्यांना समर्थन देतील, तिथं त्यांना पाठिंबा देणार अशी भूमिका जरांगेंनी घेतली होती.दरम्यान, आज पुन्हा एकदा अंतरवली सराटीमध्ये जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यभर शंभर टक्के परिवर्तन होणार, आम्ही राज्यात कोणालाही पाठिंबा दिला नाही, असं ते म्हणाले. मनोज जरांगे म्हणाले की, समीकरणं जुळणं अत्यंत आवश्यक आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आमचे समीकरणं जुळवणे सुरू आहेत. एका जातीवर निवडणुका लढवल्या जात नाहीत. या देशात अशा पद्धतीने कोणीही निवडणूक लढू शकत नाही. त्यामुळं मराठा, मुस्लीम, दलित एकत्र यायला पाहिजे, मग राज्यभर शंभर टक्के परिवर्तन होऊ शकतं, असं जरांगे म्हणाले.

पुढं ते म्हणाले, राज्यातील बांधवाना कालच सांगितलं की, तुम्ही इकडे गर्दी करू नका. गर्दी जमली की परिवर्तन होतं असं नाही. तुम्ही इकडे गर्दी केली मला काही काम सुचत नाही. अंतरवलीत 29 तारखेपर्यंत येऊ नका. मला निर्णय प्रक्रिया पूर्ण करू द्या. येत्या 30 तारखेला बैठक असून या बैठकीत काय होतं हे बघू. दलित, मुस्लिमांचा काय निर्णय होतोत ते बघू अन् निर्णय घेऊ, असं जरांगे म्हणाले.

जरांगे पाटलांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांतील लोक भेट आहेत. याबाबत ते म्हणाले की, मी सहा कोटी मराठा समाजाची नाराज करणार नाही. सहा कोटी मराठा समाजाचं वाटोळं करणार नाही. राज्यात आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही, असं जरांगे म्हणाले.

तुम्ही कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवाल? असा प्रश्न केला असता जरांगे म्हणाले की, सध्या इतके भावी आमदार झालेत. मला निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघच शिल्लक राहिला नाही, अशी मिश्कील टिप्पणी जरांगेंनी केली.

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मोठे साहेब तिथे बसले आहेत. उपसरपंचाच्या हातात सगळं आहे. पण, यावेळेस उपसरपंचाचा करेक्ट कार्यक्रम शेतकरी करणार आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close