राजकिय

एक कार्यक्रम आणि ऑपरेशन कमळ पुन्हा चर्चेत

Spread the love
चिपळूण / विशेष प्रतिनिधीं
 मागील काही दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गळती लागली आहे. UBT गटाला खासदार आणि आमदार ‘ जय महाराष्ट्र ‘ करत आहेत. अश्यातच आता पुन्हा UBT गटाला धक्का देणारी एक बातमी पसरत आहे. त्यात किती सत्यता आहे हे येणाऱ्या काळात कळेल.पण सध्यातरी राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार भास्कर जाधव यांना थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे. चिपळूण येथे आयोजित कार्यक्रमानंतर बोलताना जठार यांनी, “कोकणला तुमची गरज आहे, तुम्ही आमच्यासोबत या,” असे म्हणत भास्कर जाधव यांचे कौतुक केले.

चिपळूणमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमोद जठार आणि भास्कर जाधव एकाच व्यासपीठावर आले होते. कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना जठार म्हणाले की, भास्कर जाधव हे राज्यातील अनुभवी नेते असून त्यांच्या क्षमतेचा योग्य वापर होत नाही. उद्धव ठाकरे गटात त्यांना अपेक्षित जबाबदारी मिळत नसल्याचा दावा करत त्यांनी, “भास्कर जाधव यांची सत्तेत गरज आहे,” असे वक्तव्य केले.

यावेळी त्यांनी भविष्यातील राजकीय संकेत देणारे वक्तव्यही केले. “आज आम्ही दोघांनी एकत्र झाड लावले आहे, ते झाड भविष्यात चांगली फळे देईल,” असे म्हणत जठार यांनी सूचक टिप्पणी केली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

जठार-जाधवांची गळाभेट चर्चेत

काही महिन्यांपूर्वी प्रमोद जठार आणि भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या होत्या. गुहागरमधील स्वच्छता अभियानावेळी जठार यांनी जाधवांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. तसेच लोटे एमआयडीसीच्या दौऱ्यात “मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव असले तरी एमआयडीसीचा पालक आमदार मी आहे,” असेही त्यांनी म्हटले होते.

मात्र, या सर्व वादानंतर चिपळूणमधील कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. यावेळी प्रमोद जठार यांनी “मिले सुर मेरा तुम्हारा” अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील बदललेले राजकीय समीकरण आणि जठार यांनी दिलेली खुली ऑफर सध्या कोकणासह राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close