अपघात

दुर्दैवी अपघातात तीन सख्ख्या भावांचा मृत्यू 

Spread the love

अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघांनी गमावला जीव

अहिल्यानगर / विशेष प्रतिनिधी

          नेवासा येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला आहे. ही तिन्ही भावंड बुलेट ने  नातेवाईकांकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला पुतणगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ माजली आहे.तर गावात शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माळीचिंचोरा येथील अंबादास आहिरे यांनी घरगुती वापरासाठी तीन दिवसांपूर्वीच नवी दुचाकी खरेदी केली होती. घरात नवीन गाडी आल्याने तिघेही भाऊ प्रचंड आनंदात होते. गुरुवारी रात्री हे तिघे भाऊ याच नवीन दुचाकीवर राहाता येथील आपल्या नातेवाइकांकडे जाण्यासाठी निघाले. नेवासा-श्रीरामपूर मार्गाने जात असताना पुनतगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाची त्यांच्या दुचाकीला जोरात धडक बसली.

अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात तिघेही भाऊ गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर शुक्रवारी तिघा भावंडांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

आदित्य अंबादास अहिरे वय 16 वर्षे, दीपक अंबादास आहिरे वय 14 वर्षे आणि चैतन्य अंबादास आहिरे वय 12 वर्षे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अपघात प्रकरणी दादासाहेब मुरलीधर आहिरे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close