अपघात
पार्थिव घेऊन निघालेल्या कुटुंबाचा अपघात ७ दगावले ,१४ गंभीर जखमी


कुटुंबावर दुहेरी संकट
रांची / विशेष प्रतिनिधी
मृत्यू कधी कोणत्या रूपात येईल आणि कोणाला कसा गाठेल याचा काहीच नेम नसतो. पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी निघालेल्या कुटुंबाचा अपघात झाल्याने ७ लोक दगावले आहेत.तर १४ गंभीर जखमी झाले आहेत. या दुहेरी संकटाने कुटुंब पुरते हतबल झाले आहे. झारखंडच्या हजारीबाग चौपारण येथील जीटी रोडवरील दनुआ घाट परिसरात भरधाव वेगातील ट्रकनं प्रवासी वाहनाला धडक दिली.
प्राथमिक माहितीनुसार, झारखंडच्या बगोदर परिसरातील बिहारो टांड भागातील रहिवासी अंत्यविधीसाठी उत्तर प्रदेशातील काशीला निघाले होते. प्रवासी वाहनाच्या वर पार्थिव ठेवून त्यांचा प्रवास सुरू होता. मृताचे कुटुंबीय आणि नातेवाईक वाहनाच्या आत बसले होते. दनुआ भागातून जात असताना काही प्रवासी लघुशंकेसाठी थांबले. तेव्हा चालक वाहन रस्त्याच्या कडेला उभं करत होता. तेव्हा मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकनं प्रवासी वाहनाला जोरदार धडक दिली.
अपघातानंतर एकच हलकल्लोळ उडाला. स्थानिकांनी आणि पोलिसांनी जखमींना तातडीनं सार्वजनिक रुग्णालयात दाखल केलं. तिथे उपचारादरम्यान सात जणांनी जीव सोडला. अपघातात जखमी झालेल्या १४ जणांना प्रथमोपचार देण्यात आले. त्यांची गंभीर स्थिती पाहता चांगल्या उपचारांसाठी त्यांना हजारीबागच्या शेख भिखारी वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आलं.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केलं. जखमींची माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे. दनुआ दरीजवळ झालेल्या अपघातामुळे कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे. कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूमुळे परिवारावर आधीच शोककळा पसरली होती. त्याच सदस्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीय आणि नातेवाईक काशीला जात होते. पण रस्त्यात झालेल्या अपघातामुळे कुटुंबाला आणखी एक जबर धक्का बसला.
| Cookie | Duration | Description |
|---|---|---|
| cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
| cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
| cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
| cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
| cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
| viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!



